Anushka Troll : नो मेकअप लूकमधील व्हिडीओ शेअर करुन ट्रोल झाली अनुष्का शर्मा, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:34 PM2022-12-20T16:34:18+5:302022-12-20T16:39:20+5:30

अनुष्का शर्माने सोशल मीडियावर लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला. ज्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

Anushka Sharma brutally trolled for no makeup look in latest video watch here | Anushka Troll : नो मेकअप लूकमधील व्हिडीओ शेअर करुन ट्रोल झाली अनुष्का शर्मा, नेटकरी म्हणाले...

Anushka Troll : नो मेकअप लूकमधील व्हिडीओ शेअर करुन ट्रोल झाली अनुष्का शर्मा, नेटकरी म्हणाले...

googlenewsNext

Anushka Sharma Troll For Video: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चित्रपट जगतापासून दूर आहे. अनुष्का शर्माचे नाव अनेकदा चर्चेत असतं. मंगळवारी अनुष्का शर्माने सोशल मीडियावर लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमुळे अनुष्का शर्माला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 


सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अनुष्का शर्मा 
अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा मेकअप रूममध्ये उपस्थित असल्याचे तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की यात अभिनेत्री नो-मेकअप लूकमध्ये चेहऱ्यावर वाढलेलं वय दिसतेय.  नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनुष्का शर्माच्या या व्हिडिओवर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे- 'आता म्हातारपण आलं आहे.' आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'ही तर म्हातारी बाईसारखी दिसत आहे.' दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की- 'आता अनुष्का शर्मा पूर्वीसारखी दिसत नाही.' युजर्स अनुष्काला जोरदार ट्रोल करतायेत. 

सुपरस्टार शाहरुख खानचा 2008 मध्ये आलेल्या 'रब ने बना दी जोडी' या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनुष्का शर्मा आता हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का शर्मा गेल्या ५ वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण आगामी काळात अनुष्का शर्मा 'चकडा एक्सप्रेस' या ओटीटीवर रिलीज होणार आहे. ज्याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
 

Web Title: Anushka Sharma brutally trolled for no makeup look in latest video watch here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.