अनुष्का शर्माने पूर्ण केले पती विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज; या सेलिब्रिटींनाही केले आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 02:11 PM2018-05-24T14:11:54+5:302018-05-24T19:42:16+5:30

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या क्रमात भारतीय क्रिकेट संघाचा ...

Anushka Sharma completes her life as husband's Virat Kohli's fitness challenge; These celebrities also made the challenge! | अनुष्का शर्माने पूर्ण केले पती विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज; या सेलिब्रिटींनाही केले आव्हान!

अनुष्का शर्माने पूर्ण केले पती विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज; या सेलिब्रिटींनाही केले आव्हान!

googlenewsNext
ंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या क्रमात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज दिले. विशेष म्हणजे मोदी यांनी ते चॅलेंज स्वीकारले. मग अशात विराटची पत्नी अनुष्का शर्मा कशी मागे राहणार? फिटनेस व्हिडीओच्या या चॅलेंजमध्ये अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये ती पती विराटने दिलेले चॅलेंज स्वीकारताना दिसत आहे. 

विराटने राजवर्धन राठोड यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारताना आपला एक फिटनेस व्हिडीओ शेअर केला होता. तसेच पंतप्रधान मोदी आणि पत्नी अनुष्कालाही हे चॅलेंज दिले होते. आता अनुष्काने पतीचे चॅलेंज स्वीकारताना तिचा एक वर्कआउट व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर तिने अभिनेता वरुण धवन आणि दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल यांनाही हे चॅलेंज दिले आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का आपल्या आवडीचे वर्कआउट करताना दिसत आहे. 
 }}}} ">I accept your challenge @imVKohli. Here’s my video for the #HumFitTohIndiaFit#FitnessChallenge. I’d like to nominate my friends, @DipikaPallikal and @Varun_dvn Great initiative @Ra_THORe sir! #ComeOutAndPlaypic.twitter.com/SmdmkArT6U— Anushka Sharma (@AnushkaSharma) May 24, 2018
दरम्यान, गेल्या बुधवारी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी पुशअप्स करताना एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. यावेळी त्यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि हृतिक रोशन यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. सायनासह बºयाच लोकांनी हे चॅलेंज स्वीकारताना आपले फिटनेस व्हिडीओ शेअर केले आहेत. 

विराटनेही हे चॅलेंज स्वीकारले. त्याचबरोबर --- या कॅम्पेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्र सिंग धोनी यांनाही फिटनेस व्हिडीओ पोस्ट करण्याचे चॅलेंज दिले. विराटने जीममध्ये एक्सरसाइज करताना एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. दरम्यान, विराटने दिलेले चॅलेंज अनुष्काने पूर्ण केले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेंद्रसिंग धोनी यांनी मात्र अद्यापपर्यंत त्यांचा फिटनेस व्हिडीओ पोस्ट केला नाही. त्यामुळे ते विराटचे चॅलेंज स्वीकारणार काय? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Web Title: Anushka Sharma completes her life as husband's Virat Kohli's fitness challenge; These celebrities also made the challenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.