अनुष्का शर्मा जूनमध्ये भारतात परतणार? IPL नाही तर 'हे' कारण आहे खास!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:36 PM2024-03-27T12:36:37+5:302024-03-27T12:37:27+5:30
अनुष्का IPL मध्ये विराटला चिअर करण्यासाठी लवकरच येणार अशीही चर्चा होती. पण अनुष्का थेट जूनमध्ये भारतात येणार असल्याचं बोललं जात आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. १५ फेब्रुवारी रोजी लंडनमध्येच तिने मुलाला जन्म दिला. २० फेब्रुवारीला विराट आणि अनुष्काने ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली. तसंच लेकाचं नाव 'अकाय' ठेवण्यात आल्याचंही सांगितलं. अकाय जन्मानंतरही कोहली कुटुंब लंडनमध्येच होतं. आता काही दिवसांपूर्वीच IPL खेळण्यासाठी विराट कोहली भारतात परतला. त्याच्यासोबत अनुष्का आणि मुलंही येतील अशी अपेक्षा होती. मात्र कोहली एकटाच आला. अनुष्का पतीला पाठिंबा देण्यासाठी लवकरच येणार अशीही चर्चा होती. पण अनुष्का थेट जूनमध्ये भारतात येणार असल्याचं बोललं जात आहे.
जूनमध्ये येण्याचं नक्की काय खास कारण?
अनुष्का शर्माने गेल्या काही काळापासून कामातून विश्रांती घेतली आहे. दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर आता ती इतक्यात पु्न्हा काम करणार नाही अशीच शक्यता आहे. त्यामुळे तिच्या चाहते मात्र तिची कायम आठवण काढत आहेत. दरम्यान अनुष्का भारतात कधी येणार यावर एक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, अनुष्का जून महिन्यात भारतात परत येण्याची शक्यता आहे. लेक वामिका आता ३ वर्षांची झाली आहे. तिला आता शाळेत दाखल करायचं असल्याने अनुष्का दोन्ही मुलांसह जूनमध्ये परत येऊ शकते. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद आहेत. जूनमध्ये सर्व शाळा सुरु होतील. वामिका प्ले स्कुलमध्ये दाखल करण्यासाठी ती भारतात येण्याची शक्यता आहे. तरी अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
विराट कोहली सध्या IPL खेळत आहे. तर अनुष्का दोन्ही मुलांसह लंडनमध्ये आहे. विराटच्या बंगळुरु संघाने दुसरा सामना जिंकला तेव्हा विराटने अनुष्काला व्हिडिओ कॉल लावला होता. यामध्ये विराट दोन्ही मुलांशीही गप्पा मारत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरुन दिसत होतं. त्याचे क्युट हावभाव व्हायरल झाले होते.