दुस-यांच्या आयुष्यात नाक खुपसणे बंद करा...! अनुष्का शर्मा संतापली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 10:20 AM2019-07-30T10:20:30+5:302019-07-30T10:20:38+5:30
अनुष्काने काही काळ ब्रेक घेतला. याचकाळात अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. आत्तापर्यंत अनुष्काने या चर्चांवर काहीही खुलासा केला नव्हता. पण अखेर तिने चुप्पी सोडली. केवळ इतकेच नाही तर प्रेग्नंसीच्या बातम्यांवर ती जाम संतापली.
ठळक मुद्दे मला खुलासा देण्याची गरज आहे? मी म्हणेल नाही, मुळीच नाही,’ असे अनुष्का यावेळी म्हणाली.
गतवर्षी अनुष्का शर्माचे चार सिनेमे प्रदर्शित झाले होते. परी,जीरो, सुई धागा आणि संजू. त्यामुळे गतवर्षी अनुष्का प्रचंड बिझी होती. यानंतर अनुष्काने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तिचा ‘ब्रेक’ अद्यापही संपलेला नाही. याचकाळात अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. आत्तापर्यंत अनुष्काने या चर्चांवर काहीही खुलासा केला नव्हता. पण अखेर तिने चुप्पी सोडली. केवळ इतकेच नाही तर प्रेग्नंसीच्या बातम्यांवर ती जाम संतापली.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का यावर बोलली. ‘एका अभिनेत्रीने लग्न केले की, लगेच काही महिन्यांत तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु होतात. ती कुणाला डेट करत असेल तर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण येते. हा सगळा मूर्खपणा आहे. दुस-यांच्या आयुष्यात नाक खुपसणे बंद व्हायला हवे. एखाद्या व्यक्तीला बळजबरीने खुलासा देणे भाग पडावे, मुळात असे वातावरण का निर्माण केले जाते? या सगळ्या गोष्टींची मला चीड येते. काय मलाही खुलासा देण्याची गरज आहे? मी म्हणेल नाही, मुळीच नाही,’ असे अनुष्का यावेळी म्हणाली.
ती पुढे म्हणाली की,‘अभिनेत्रीचे लग्न झाले रे झाले की, तिच्याबद्दल नको ते बोलले जाते. तिने थोडे सैल कपडे घातले की, लोकांचे कान टवकारतात. तिने सैल कपडे का घालू नयेत, शेवटी ते ट्रेंडमध्ये असतात. पण लोक मात्र लगेच ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु करतात. या चर्चा थांबणा-या नाहीत. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही केवळ याकडे दुर्लक्ष करू शकता.’
एकंदर काय तर प्रेग्नंसीच्या चर्चांवर अनुष्का संतापली. यावरून तुम्हाला हवे ते उत्तर मिळालेय असेल, होय ना?