Anushka Sharma: बिस्किटच्या फोटोवरुन ट्रोल झाली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीवर आली माफी मागण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 03:41 PM2022-09-09T15:41:37+5:302022-09-09T16:49:07+5:30

अनुष्का शर्माकडून एक चूक झाली, ज्यामुळे तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली अखरे अभिनेत्रीने माफी मागितली आहे.

Anushka sharma trolled for the wrong spelling of biscuits actress apologized | Anushka Sharma: बिस्किटच्या फोटोवरुन ट्रोल झाली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीवर आली माफी मागण्याची वेळ

Anushka Sharma: बिस्किटच्या फोटोवरुन ट्रोल झाली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीवर आली माफी मागण्याची वेळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनुष्का शर्माने बिस्किटांचा रिव्ह्यू केला आणि ट्रोल झाली. पण यादरम्यान अनुष्काने अशी चूक केली, ज्यामुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली. यानंतर अभिनेत्रीने माफी मागितली आहे.

अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक नोट शेअर केली. यानंतर त्यांनी एकामागून एक अनेक  बिस्किटांचे फोटो शेअर केले. यासोबतच अनुष्काने तिला कोणते बिस्किट आवडले आणि कोणते नाही हे देखील सांगितले. अनुष्काने अनेक बिस्किटांना पाचपैकी फक्त दोन नंबर दिले आहेत, तर काहींनी तीन नंबरही दिले आहेत. पण यादरम्यान, अभिनेत्रीने एका ठिकाणी बिस्किटचं स्पेलिंग चुकीचे लिहिले, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले.

अनुष्काने तिच्या स्टोरीमध्ये बिस्किटचं स्पेलिंग चुकीचे लिहिताच. तिला ट्रोल करायला सुरुवात केली, त्यानंतर अभिनेत्रीने लगेचच लोकांची माफी मागितली आणि पुढे जाण्याचा सल्ला दिला. अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'माझ्या चुकीच्या स्पेलिंगमुळे कोणी नाराज झाले असेल तर मी त्या सर्व लोकांची माफी मागते. 

'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटात क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या कर्तृत्वासोबतच क्रिकेटच्या प्रवासातील तिचा वैयक्तिक ते शैक्षणिक संघर्षही दाखवण्यात येणार आहे. अनुष्का शर्मानेही झुलन गोस्वामीच्या भूमिकेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाद्वारे अनुष्का बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत आहे. अनुष्का अखेरची 2018 मध्ये 'झिरो'मध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत दिसली होती.

Web Title: Anushka sharma trolled for the wrong spelling of biscuits actress apologized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.