अकायला कडेवर घेऊन उभी अनुष्का, बाजूला असलेल्या विराटने दिला 'अँग्री लूक'! Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:58 PM2024-09-09T16:58:58+5:302024-09-09T16:59:44+5:30

विराट आणि अनुष्का लंडनच्या रस्त्यावर फुटपाथवर उभे आहेत

anushka sharma virat kohli video from london anushka was carrying Akaay in her arms | अकायला कडेवर घेऊन उभी अनुष्का, बाजूला असलेल्या विराटने दिला 'अँग्री लूक'! Video व्हायरल

अकायला कडेवर घेऊन उभी अनुष्का, बाजूला असलेल्या विराटने दिला 'अँग्री लूक'! Video व्हायरल

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या स्टार कपलला लंडनला शिफ्ट होऊन काही महिने झालेत. नुकतीच अनुष्का मुंबईत आली होती. काही इव्हेंट्समध्ये ती सहभागी झाली होती. आता विराट-अनुष्काचा लंडनमधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये बेबी अकायचीही झलक पाहायला मिळत आहे. तसंच विराटच्या अँग्री लूकनेही लक्ष वेधलंय. काय आहे हा व्हिडिओ बघा.

विराट आणि अनुष्का लंडनच्या रस्त्यावर फुटपाथवर उभे आहेत. तिथे ते रस्ता क्रॉस करण्याच्या तयारीत आहेत. मागून एक चाहता त्यांचा व्हिडिओ काढत आहे. यावेळी विराटचं मागे लक्ष जातं आणि तो अँग्री लूकही देतो. तर बाजूला उभी असलेल्या अनुष्काने चिमुकल्या अकायला समोर धरलं आहे. विराट नंतर अनुष्काकडे पाहून काहीतरी बोलतो आणि अनुष्काही लगेच इकडे पाहत लूक देते.  यामध्ये वामिका मात्र दिसत नाही. तसंच अकायचा चेहराही दिसत नाही. तरी चाहते हा व्हिडिओ पाहून खूश झालेत. लंडनमधले विराट-अनुष्काचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. आता हाही व्हिडिओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.


 

या व्हिडिओत विराटचा अँग्री लूक पाहून नेटकऱ्यांनीही मजा घेतली आहे. 'विराट be like फोन तोड दुँगा', ' अनुष्का, कोणीतरी आपला फोटो काढतंय', 'हा कुठेही गेला तरी याला प्रायव्हसी मिळणार नाही' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.  विराट आणि अनुष्का दोघांनाही अगदी सामान्य आयुष्य जगायचं आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे भारतात तसं राहणं शक्य नाही. म्हणूनच ते लंडनला शिफ्ट झाले आहेत. त्यांना मुलांनाही तसंच आयुष्य द्यायचं आहे. अनुष्काने फेब्रुवारी महिन्यात लंडनमध्येच अकायला जन्म दिला. त्यांचे चाहते मात्र त्यांची भारतात  आठवण काढत आहेत.

Web Title: anushka sharma virat kohli video from london anushka was carrying Akaay in her arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.