अनुष्का शर्मा-विराट कोहलीने मुंबईत 'या' हॉटेलमध्ये साऊथ इंडियन पदार्थांचा घेतला आस्वाद! स्टाफसोबतचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:55 IST2024-11-08T12:52:53+5:302024-11-08T12:55:24+5:30
अनुष्का शर्मा - विराट कोहली या दोघांनी मुंबईतील प्रसिद्ध पाली हिलमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये साऊथ इंडियन पदार्थांवर ताव मारला (anushka sharma, virat kohli)

अनुष्का शर्मा-विराट कोहलीने मुंबईत 'या' हॉटेलमध्ये साऊथ इंडियन पदार्थांचा घेतला आस्वाद! स्टाफसोबतचा फोटो व्हायरल
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून एकत्र डिनरला जाताना दिसतात. शिवाय भजन-किर्तनात रमलेले दिसतात. अनुष्का शर्मा-विराट कोहली परदेशात स्थायिक झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पण नुकतंच या दोघांच्या सीक्रेट मुंबई भेटीची सोशल मीडियावर चर्चा आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांचा मुंबईतील एका रेस्टॉरंटमधील फोटो व्हायरल झाला असून त्यांनी हॉटेल स्टाफसोबत फोटो काढून सर्वांना आनंद दिलाय.
अनुष्का शर्मा-विराट कोहलीची मुंबई भेट
अनुष्का शर्मा-विराट कोहली या दोघांचा मुंबईतील एक रेस्टॉरंटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोघेही चांगलेच खवय्ये आहेत हे त्यांनी अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितलंय. अशातच अनुष्का-विराटने मुंबईत पाली हिलला असणाऱ्या Benne - Heritage Bangalore Dosa या हॉटेलला भेट दिली. तिथे जाऊन दोघांनी साऊथ इंडियन पदार्थांचा आस्वाद घेतला. इतकंच नव्हे तर स्टाफसोबत फोटो काढून सर्वांना आनंद दिला.
अनुष्का-विराट मुंबईत झाले शिफ्ट?
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा व्हायरल फोटो बघून चाहत्यांनी अंदाज लावलाय की हे दोघेही मुंबईत शिफ्ट झाले आहेत. अनुष्का-विराट मुलगा अकायच्या जन्मानंतर लंडनमध्ये गेले अनेक महिने स्थायिक होते. अनुष्का सुद्धा भारतात कमी दिसली. परंतु हा फोटो बघून दोघे पुन्हा मुंबईत शिफ्ट झाले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया-भारत टेस्ट सीरिज २२ नोव्हेंबरला रिलीज होतेय. त्यामुळे त्याआधी हे दोघे मुंबईतून रवाना होतील असंही बोललं जातंय.