आई बनल्यानंतर जीवनात हे बदल करायचेत अनुष्का शर्माला, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 19:04 IST2020-11-28T19:04:36+5:302020-11-28T19:04:59+5:30
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई बनणार आहे.

आई बनल्यानंतर जीवनात हे बदल करायचेत अनुष्का शर्माला, जाणून घ्या याबद्दल
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई बनणार आहे. बऱ्याच महिन्यांपासून अनुष्का बॉलिवूडमधून गायब होती आणि यादरम्यान तिने आई बनण्याचा निर्णय घेतला. अनुष्का शर्मा स्वतः आई बनण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि आता ती जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. आई झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट पूर्वीसारखी राहत नाही. अनुष्का शर्माने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, आई बनल्यानंतर तिचे जीवन कसे असणार आहे.
अनुष्का शर्माने नुकतेच बॉम्बे टाइम्सशी बोलताना खासगी गोष्टींवर चर्चा केली. अनुष्का म्हणाली की, ती आई बनण्यासाठी जेवढी उत्सुक आहे तेवढी कामावर परतण्यासाठी उत्सुक आहे. ती म्हणाली की, आई बनल्यानंतर लगेच शूटिंग सेटवर परतणार आहे. मी असे प्लानिंग करणार आहे ज्यात मी बाळ, घर आणि काम यांच्यामध्ये समतोल साधू शकेन.मी जोपर्यंत जिंवत आहे तोपर्यंत काम करत आहे. कारण मला अभिनयातून खूप आनंद मिळतो.
अनुष्का शर्माच्या आधी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेग्नेंसीनंतर दमदार कमबॅक केले आहे. करीना कपूर याचे उत्तम उदाहरण आहे. करीनादेखील सध्या प्रेग्नेंट आहे. काही दिवसांपूर्वी करीनाने आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती झिरो सिनेमात दिसली होती. याशिवाय तिची निर्मिती असलेली वेबसीरिज पाताल लोक आणि बुलबुल चित्रपट रिलीज झाली आहे.