बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का शर्मा? IND vs PAK मॅचमधील अभिनेत्रीचा विरोटबरोबरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 17:29 IST2023-10-15T17:28:49+5:302023-10-15T17:29:16+5:30
भारत-पाक सामन्यादरम्यानचा अनुष्का आणि विराटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का शर्मा? IND vs PAK मॅचमधील अभिनेत्रीचा विरोटबरोबरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
सध्या सर्वत्र वर्ल्डकपचा फिव्हर पाहायला मिळत आहे. नुकताच वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रोमहर्षक सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये पार पडलेल्या या सामन्याला हजारो क्रिकेटप्रेमींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही पती विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होती.
भारत-पाक सामन्यादरम्यानचा अनुष्का आणि विराटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्काने भारत-पाक सामन्यासाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मॅचनंतर विराट आणि अनुष्का भारतीय टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे दिसून आले. या व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का बेबी बंप लपवत असल्याचं नेटकरी म्हणत आहे. त्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
Virat Kohli and Anushka Sharma at Team Hotel, Ahmedabad❤️#viratkohli#anushkasharmapic.twitter.com/Xaqc7sXuIc
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) October 14, 2023
काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विराट आणि अनुष्का पुन्हा आईबाबा होणार असल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तीने हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं होतं. तेव्हापासून अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, अद्याप याबाबत विराट किंवा अनुष्काने कोणतंही भाष्य केलेलं नाही.
विराट आणि अनुष्काने २०१७मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नाच्या चार वर्षांनी अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचं नाव वामिका आहे. विराट-अनुष्का त्यांच्या लेकीला माध्यमांपासून दूर ठेवतात. त्यांनी सोशल मीडियावरही तिचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही.