IND विरुद्ध NZ च्या अंतिम सामन्यादरम्यान अनुष्का शर्माची नवीन पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:01 IST2025-03-09T16:01:21+5:302025-03-09T16:01:37+5:30

अनुष्का शर्माच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी  क्रिकेटशी संबंधित मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Anushka Sharma Women’s Day 2025 Post Viral Amid Ind Vs Nz Champions Trophy 2025 Final | IND विरुद्ध NZ च्या अंतिम सामन्यादरम्यान अनुष्का शर्माची नवीन पोस्ट व्हायरल

IND विरुद्ध NZ च्या अंतिम सामन्यादरम्यान अनुष्का शर्माची नवीन पोस्ट व्हायरल

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ( ICC Champions Trophy) च्या अंतिम सामन्यात भारतविरुद्ध न्यूझीलंड असा थरार आज रंगला.  हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (IND vs NZ Champions Trophy 2025 Final) सुरू आहे.  या सामन्यात नाणेफेक ही न्यूझीलंड संघाने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिची पोस्ट व्हायरल होत आहे. 

अनुष्कानं काल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं २०२५ च्या महिला दिनानिमित्त काही फोटो पोस्ट केले. अभिनेत्रीने टी-शर्ट आणि डेनिम परिधान केल्याचं दिसलं. या फोटोंमध्ये अनुष्का आनंदात दिसून येत आहे. कॅप्शनमध्ये अनुष्काने गुलाबाचा इमोजी पोस्ट केला होता. अनुष्का शर्माच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी  क्रिकेटशी संबंधित मजेशीर कमेंट केल्या आहेत.


अनुष्काच्या पोस्टवर एका युजरने लिहिले, 'भावाला शतक करायला सांगा'. तर एकाने लिहलं, "या पोस्टवर जेवढे लाईक पडतील, तेवढ्या धावा किंग कोहली बनवले". आणखी एकाने लिहलं, "माझ्या आवडत्या पुरूषाची आवडती स्त्री".  अनुष्का शर्मा अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यांमध्ये तिचा पती विराट कोहलीला चीअर करताना दिसली होती.  प्गेमचेंजर विराट कोहलीची अनुष्का ही सपोर्ट सिस्टिम आहे.  अनुष्का चित्रपटांपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.
 

Web Title: Anushka Sharma Women’s Day 2025 Post Viral Amid Ind Vs Nz Champions Trophy 2025 Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.