अलिबाग-मुंबई-अलिबाग अनुष्काचा प्रवास, पण सोबत दिसला नाही विराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:13 IST2025-01-13T14:11:18+5:302025-01-13T14:13:23+5:30

Anushka Sharma-Virat Kohli: रविवारी विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा दिसली होती. ती अलिबागला गेली होती, पण आज मुंबईत आली होती आणि परत अलिबागला जाताना दिसली.

Anushka Sharma's Alibaug-Mumbai-Alibagh journey, but Virat Kohli was not seen with her | अलिबाग-मुंबई-अलिबाग अनुष्काचा प्रवास, पण सोबत दिसला नाही विराट

अलिबाग-मुंबई-अलिबाग अनुष्काचा प्रवास, पण सोबत दिसला नाही विराट

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच ते आपल्या दोन मुलांसह प्रेमानंद महाराजांना भेटायला आले होते. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर रविवारी दोघेही अलिबागला रवाना झाले. दोघेही गेटवे ऑफ इंडियावर दिसले. मात्र आता अनुष्का शर्मा सोमवारी सकाळी अलिबागहून मुंबईत परतली आहे. त्यानंतर ती पुन्हा अलिबागला परतली आहे. मात्र यावेळी विराट कोहली अनुष्का शर्मासोबत नव्हता. 

अनुष्काच्या लूकबद्दल सांगायचे तर तिने यावेळी व्हाइट आणि ब्लॅक जीन्स परिधान केली होती. यासोबत तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. तिने चेन पेंडेंटने तिचा लूक पूर्ण केला. अनुष्काने गॉगलने तिचा लूक पूर्ण केला. ती नो मेकअप लूकमध्ये दिसली आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. संपूर्ण लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अनुष्काचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


२०२३ मध्ये अशी बातमी आली होती की, विराट कोहलीने अलिबागच्या अवास लिव्हिंगमध्ये २००० स्क्वेअर फुटांच्या आलिशान व्हिलावर ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांनी ३६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती. या मालमत्तेमध्ये ४०० चौरस फुटांचा स्विमिंग पूल देखील आहे. लोकप्रिय इंटेरियर डिझायनर आणि हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान हिने व्हिला डिझाइन केला आहे. याशिवाय विराट आणि अनुष्का शर्माने १९.२४ कोटी रुपयांना अलिबागमध्ये फार्महाऊस खरेदी केल्याची माहिती आहे.


अनुष्का शर्मा आणि विराट कोहली २०१७ मध्ये इटलीत विवाहबद्ध झाले. आता हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत. त्यांनी मुलीचे नाव वामिका आणि मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. या जोडप्याने अद्याप मुलांचे चेहरे दाखवलेले नाहीत.

Web Title: Anushka Sharma's Alibaug-Mumbai-Alibagh journey, but Virat Kohli was not seen with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.