​अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा अनोखा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 03:20 PM2017-02-12T15:20:48+5:302017-02-12T20:50:48+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अनुष्काच्या प्रोेडक्शन हाऊसचा आगामी चित्रपट ‘फिलौरी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला ...

Anushka Sharma's unique record of 'Fillori' | ​अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा अनोखा विक्रम

​अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा अनोखा विक्रम

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अनुष्काच्या प्रोेडक्शन हाऊसचा आगामी चित्रपट ‘फिलौरी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात साकारलेली तिची भूमिका सध्या चांगलीच चर्चेत येत आहे. प्रदर्शनापूर्वीच अनुष्काचा फिलौरी या चित्रपटाचा ट्रेलर यू-ट्युबर हिट ठरला आहे. रिलीजनंतर केवळ चोवीस तासांत सर्वाधिक पहिलेला ट्रेलर ठरला असून आजपर्यंतचे बॉलिवूड चित्रपटाचे रेकॉर्डही ट्रेलरने मोडित काढले आहे.

अनुष्का शर्मा, दलजित दोसांझ, सूरज शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या फिलौरी या चित्रपटाचा ट्रेलर ६ फे ब्रुवारीला रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात अनुष्काची भूमिका आगळी वेगळी असल्याने याची खूप चर्चा झाली होती. फिलौरीच्या ट्रेलर रिलीजनंतर केवळ २४ तासात १०.३ दशलक्ष वेळा पाहिले गेले. म्हणजेच तब्बल १ कोटी ३० लाख वेळा हा ट्रेलर पाहिला गेला. हा बॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलरचा अनोखा विक्रम आहे. ट्रेलरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल अनुष्का शर्मासह चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि तंत्रज्ञ खूश झाले आहेत. ‘फिलौरी’ हा फॉक्स स्टार स्टूडिओज आणि क्लीन स्लेट फिल्म्स यांच्या संयुक्त निर्मितीचा चित्रपट आहे. ‘फिलौरी’ चित्रपट २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



या चित्रपटात अनुष्का एका ग्लॅमरस भूताची भूमिका साकारताना दिसतेयं. इच्छा अतृप्त राहिल्याने अनुष्काची आत्मा भटकते आहे. अभिनेता सूरज शर्मा हा सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मंगळ असल्याने सूरजला मुलीशी लग्न करण्याआधी गावातील एका झाडाशी विवाह करावा लागतो. मात्र हे लग्न होत असताना या झाडावर राहणारी एक अतृप्त आत्मा(अनुष्का शर्मा) सूरजसमोर येते आणि स्वत:ची एक अतिशय रोमांचक प्रेमकथा त्याला ऐकवते. अनुष्काचे दिलजीत दोसांजवर प्रेम असते. पण हे प्रेम अधुरे राहते,असे या चित्रपटाचे कथानक आहे.  
 

Web Title: Anushka Sharma's unique record of 'Fillori'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.