अनुष्का शेट्टीने पहिल्यांदाच केला तिच्या आणि प्रभासच्या नात्याविषयी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:01 PM2020-03-16T19:01:58+5:302020-03-16T19:07:49+5:30

प्रभास आणि अनुष्काच्या नात्याची नेहमीच मीडियात चर्चा रंगते.

Anushka Shetty calls Baahubali actor Prabhas her 3 am friend PSC | अनुष्का शेट्टीने पहिल्यांदाच केला तिच्या आणि प्रभासच्या नात्याविषयी खुलासा

अनुष्का शेट्टीने पहिल्यांदाच केला तिच्या आणि प्रभासच्या नात्याविषयी खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देअनुष्काने सांगितले आहे की, मी प्रभासला जवळजवळ गेल्या 15 वर्षांपासून ओळखते. तो माझा खूप जवळचा मित्र असून मी त्याला रात्री तीनला देखील फोन करून शकले. आमच्या दोघांचेही लग्न झाले नसल्याने आमचे एकमेकांसोबत अनेकवेळा नाव जोडले जाते.

प्रभासने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही बाहुबली या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रचंड गाजले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. प्रभास नुकताच साहो या हिंदी चित्रपटात देखील झळकला होता. प्रभासच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. 

प्रभास आणि अनुष्का शेट्टीची बाहुबली या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्याचे नाव अनुष्का शेट्टीसोबत नेहमीच जोडले जाते. त्या दोघांनी रिअल लाइफमध्येही एकत्र यावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. वास्तविक या चित्रपटानंतरच दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या केवळ अफवा असल्याचे दोघांनीही अनेक वेळा स्पष्ट केले आहे.

प्रभास आणि अनुष्काच्या नात्याबद्दल आता एक नवा खुलासा अनुष्काने केला आहे. डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने सांगितले आहे की, मी प्रभासला जवळजवळ गेल्या 15 वर्षांपासून ओळखते. तो माझा खूप जवळचा मित्र असून मी त्याला रात्री तीनला देखील फोन करून शकले. आमच्या दोघांचेही लग्न झाले नसल्याने आमचे एकमेकांसोबत अनेकवेळा नाव जोडले जाते. तसेच आमची स्क्रीनवरची जोडी देखील आमच्या फॅन्सना खूप आवडते. आम्ही दोघेही स्वभावाने खूप सारखे आहोत. आम्ही काहीच लपवू शकत नाही. त्यामुळे आमच्यात काहीही असते तर आतापर्यंत सगळ्यांच्या समोर आले असते.

अनुष्काचे आजवर अनेकांसोबत नाव जोडण्यात आले आहे. साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. राघवेंद्र यांचा मुलगा प्रकाश कोवलामुडीसोबत अनुष्का लवकरच लग्नबंधनात अडकू शकते असे काही दिवसांपूर्वी म्हटले जात होते. प्रकाशचा घटस्फोट झाला असून  2014 मध्ये त्याने लेखिका कनिका ढिल्लनसोबत लग्न केले होते. पण दोन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. प्रकाशने साऊथच्या काही चित्रपटात कामंही केलेय.

या चर्चांना ऊत येण्यापूर्वी अनुष्का एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची बातमी आली होती. क्रिकेटपटू नॉर्थमधील असून साऊथ रणजी टीमसाठी तो खेळत असल्याचे म्हटले गेले होते. त्याच्या नावाचा मात्र खुलासा झाला नव्हता.

Web Title: Anushka Shetty calls Baahubali actor Prabhas her 3 am friend PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.