अनुष्का शेट्टीसोबतच्या लिंकअपविषयी पहिल्यांदा बोलला प्रभास, म्हटले ‘अशी चर्चा कॉमन असते’!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 10:55 AM2017-08-05T10:55:56+5:302017-08-05T16:25:56+5:30
सिनेप्रेमींना सुरुवातीला हा प्रश्न पडायचा की, बॉलिवूडचा दबंग सलमान खान लग्न केव्हा करणार? आता या लिस्टमध्ये ‘बाहुबली’स्टार प्रभास याचेही ...
स नेप्रेमींना सुरुवातीला हा प्रश्न पडायचा की, बॉलिवूडचा दबंग सलमान खान लग्न केव्हा करणार? आता या लिस्टमध्ये ‘बाहुबली’स्टार प्रभास याचेही नाव जोडले गेले असून, प्रभास लग्नाच्या बंधनात अडकणार तरी केव्हा? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत आहे. असो, प्रभास साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा आहे. परंतु जेव्हापासून त्याचे नाव ‘बाहुबली’शी जोडले गेले तेव्हापासून प्रभास देशभरात प्रसिद्ध झाला. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये तुफान वाढ झाली असून, त्याच्याविषयीची प्रत्येक बातमी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्याचबरोबर त्याचे अफेयर कोणाबरोबर आहे, हा प्रश्न तर चाहत्यांसाठी जिव्हाळा ठरत आहेत. त्यातही ‘बाहुबली’मधील त्याची देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीबरोबर त्याचे लिंकअप आहे की नाही हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना प्रचंड ईच्छा आहे. यासंबंधीचीच एक बातमी आम्ही घेऊन आलो असून, ते वाचून तुम्हाला प्रभास आणि अनुष्कातील लिंकअप बातम्यांचा उलगडा होईल, हे नक्की.
खरं तर ‘बाहुबली-२’ रिलीज झाल्यापासून अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे नाव प्रभाससोबत जोडले जात आहे. मात्र प्रभासने यावर त्याची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता त्याचा संयम सुटला असून, नुकतेच त्याने याविषयी अतिशय बिनधास्तपणे प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत प्रभासने म्हटले की, ‘लगेचच माझ्या फॅन्सला (फिमेल) काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण मी आताच लग्न करणार नाही. कारण सध्या मी याविषयी विचारदेखील करीत नाही.’
अनुष्कासोबतच्या लिंकअप बातम्याविषयी प्रभास म्हणतोय की, ‘अशा प्रकारच्या बातम्या कॉमन असतात. मला तर याची सुरुवातीपासूनच जाणीव होती. जर तुम्ही एखाद्या अभिनेत्रीसोबत दोनपेक्षा अधिक चित्रपट करता तेव्हा त्या अभिनेत्रीसोबतच्या लिंकअपच्या अफवा पसरविल्या जातात. माझ्यासाठी ही बाब खूपच नॉर्मल आहे. सुरुवातीला मला याचे वाईट वाटायचे. मी विचार करायचो की, लोक असे लिहू कसे शकतात? मात्र आता मला याची सवय झाली असून, या बातम्यांचा किंवा अफवांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.’ प्रभासचे हे वक्तव्य एक गोष्ट स्पष्ट करते की, त्याचे अनुष्कासोबत कुठल्याही प्रकारचे लिंकअप नाही.
वास्तविक प्रभास नेहमीच कामाला प्राधान्य देत आला आहे. कुठल्याही भूमिकेसाठी शंभर टक्के देणे हे त्याचे टार्गेट असते. ‘बाहुबली’च्या अफाट यशावरून ही बाब स्पष्टही होते. कारण त्याने करिअरची तब्बल चार वर्षे केवळ ‘बाहुबली’ला दिले. सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटासाठी काम करीत असून, सध्या तो या चित्रपटाविषयी खूपच एक्साइटेड असल्याचे दिसून येते. या चित्रपटातही अनुष्का त्याच्यासोबत रोमान्स करणार होती, परंतु काही कारणास्तव तिला हा चित्रपट सोडावा लागला.