'मणिकर्णिका'मध्ये कंगना राणौतशिवाय 'या' अभिनेत्याने ही केले सारे स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 04:25 PM2018-07-07T16:25:31+5:302018-07-07T16:27:40+5:30
कंगना राणौतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' सिनेमा रिलीजच्या आधीच चर्चेत आहे. या सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारते आहे.
कंगना राणौतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' सिनेमा रिलीजच्या आधीच चर्चेत आहे. या सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारते आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तलवारबाजीचे करताना कंगना जखमी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कंगनाशिवाय या सिनेमात आणखीन एक असा अभिनेता आहे ज्याने सगळे स्टंट स्वत: केले आहेत.
कंगना व्यक्तीरिक्त सोनू सूदसुद्धा या सिनेमात मुख्य भूमिका साकारतो आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार सोनू सूदने तलवारबाजीचा स्टंट स्वत: केला आहे. यबाबत सोनूचे म्हणणे आहे की, त्याला स्वत: स्टंट करायला आवडतात. सोनूला हे स्टंट करण्यास नकार देण्यात आला होता मात्र त्यांने मेकर्सला यासाठी तयार केले. सोनू यात सदाशिव ही भूमिका साकारतो आहे. सदाशिव म्हणजेच राणी लक्ष्मी बाई यांचा पती गंगाधर राव. यासोबतच टेलिव्हिजन गाजवलेली अंकिता लोखंडेला एका मोठ्या भूमिकेसाठी साईन करण्यात आले आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत. आधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता मात्रा स्पेशल इफेक्ट्सचे काम अजून बाकी आहे. आता निर्माते सप्टेंबरमध्ये चित्रपट रिलीज करण्याचा विचार करतायेत.