'अपने बाप से पूछना कौन हूं मैं' जेव्हा सगळ्यांसमोर राजकुमार यांनी सलमानला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 04:16 PM2022-07-28T16:16:59+5:302022-07-28T16:17:33+5:30

जेव्हा सुजर बडजात्या सलमानची राजकुमार यांच्याशी ओळख करुन देत होते तेव्हा सलमानने तुम्ही कोण? असा प्रश्न विचारला. हे ऐकताच राजकुमार यांना प्रचंड राग आला आणि सगळ्यांसमोर 'बरखुरदार अपने बाप से पूछना कौन हूं मैं' म्हणत चांगलेच सुनावले होते. यातून सलमानलाही चांगलाच धडा मिळाला होता.

'Apne Baap Se Poochna Kaun Hoon Main' when Rajkumar Scolded Salman In Front Of Everyone | 'अपने बाप से पूछना कौन हूं मैं' जेव्हा सगळ्यांसमोर राजकुमार यांनी सलमानला फटकारलं

'अपने बाप से पूछना कौन हूं मैं' जेव्हा सगळ्यांसमोर राजकुमार यांनी सलमानला फटकारलं

googlenewsNext

सलमानविषयी रसिकांचं प्रेम इतकं आहे की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते उत्सुक असतात. सलमानच्या नावावर बॉक्स ऑफिसवर सिनेमा गलेलठ्ठ कमाई करतात. त्याचा प्रत्येक सिनेमा पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दीही करतात. अनेकदा सलमानचे खासगी आयुष्यातले किस्से ऐकायला मिळतात. त्यातलाच एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सलमानचा स्वभाव जगजाहीर आहे. इतरांना एटीट्यूड देणाऱ्या सलमानला जेव्हा दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांनी चांगलेच सुनावले होते. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. 'बिवी हो तो ऐसी' सिनेमा सलमानचा पहिला सिनेमा असला तरी, 'मैने प्यार किया' सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. याच सिनेमातून सलमानलाही प्रचंड लोकप्रियताही मिळाली होती. या सिनेमातून सलमान रातोरात स्टार बनला. सिनेमा सुपरहिट ठरल्यामुळे सूरज बडजात्या यांनी सस्केस पार्टी ठेवली होती. या पार्टीत सगळे दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेता राजकुमार यांनीही हजेरी लावली होती.

सिनेमा हिट ठरल्यामुळे सलमानला तसाही चांगलाच एटीट्युड आला होता. त्याचदरम्यान सलमानला नशा करण्याचीही सवय लागली होती. या पार्टीत ड्रिंक घेवूनच सलमानने आला होता, नशेत बेधुंद असलेल्या सलमानला सुरज बडजात्या सगळ्यांसह त्याची ओळख करुन देत होते. यानंतर राजकुमार यांच्याशी सलमानशी ओळख करुन देण्यात आली.

जेव्हा सुजर बडजात्या सलमानची राजकुमार यांच्याशी ओळख करुन देत होते तेव्हा सलमानने तुम्ही कोण? असा प्रश्न विचारला. हे ऐकताच राजकुमार यांना प्रचंड राग आला आणि सगळ्यांसमोर 'बरखुरदार अपने बाप से पूछना कौन हूं मैं' म्हणत चांगलेच सुनावले होते. यातून सलमानलाही चांगलाच धडा मिळाला होता.

जेव्हा कधी कोणत्या पार्टीत सलमान जायचा तिथे मोठ्यांसोबत आदरानेच बोलायचा. राजकुमार असतील तर स्वतःहून त्यांना भेटायचा आणि त्यांची विचारपुस करायचा. राजकुमार यांचा स्वभाव कडक होता. त्यांनी सलमानलाच नाही तर त्याआधी अनेकांना चांगलेच फटकारले होते. ३ जुलै १९९६ मध्ये राजकुमार यांचे निधन झाले होते.

Web Title: 'Apne Baap Se Poochna Kaun Hoon Main' when Rajkumar Scolded Salman In Front Of Everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.