AR Rahman Birthday Special: ए. आर. रहमानची मालमत्ता ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का, वाचा संपत्तीचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:38 PM2020-01-06T12:38:27+5:302020-01-06T12:40:15+5:30

ए. आर. रहमान यांनी आज देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रियता मिळाली असून त्यांनी प्रचंड पैसा देखील कमावला आहे.

AR Rahman Birthday Special: AR Rahman is top musician on the 2019 Forbes India | AR Rahman Birthday Special: ए. आर. रहमानची मालमत्ता ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का, वाचा संपत्तीचा आकडा

AR Rahman Birthday Special: ए. आर. रहमानची मालमत्ता ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का, वाचा संपत्तीचा आकडा

googlenewsNext
ठळक मुद्देए. आर. रहमान यांनी 2019 मध्ये 94.8 कोटी कमाई केली असून 2018 मधील त्यांची कमाई 66.75 कोटी होती. फोर्ब्सच्या यादीत त्यावेळी ते 11 व्या क्रमांकावर होते तर 2017 मध्ये त्यांनी 57.63 इतकी कमाई केली होती. 

ए. आर. रहमान यांनी आज बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध संगीतकार आणि गायक म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या सगळ्यांच गाण्यांना रसिकांचे नेहमीच प्रेम मिळाले आहे. त्यांनी बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला देखील एकाहून एक सरस गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गाण्यांसाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आज देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रियता मिळाली असून त्यांनी प्रचंड पैसा देखील कमावला आहे.

फोर्ब्स या मासिकाने सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या 100 सेलिब्रेटींची यादी नुकतीच जाहीर केली असून या यादीत ए. आर. रहमान 16 व्या स्थानावर आहे. संगीत क्षेत्रातील व्यक्तींमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये त्यांचा पहिला क्रमांक आहे. ए. आर. रहमान केवळ चित्रपटांद्वारे नव्हे तर त्यांच्या गाण्याच्या शो द्वारे देखील बक्कळ पैसा कमावतात. अमेरिका, कॅनडा सारख्या ठिकाणी त्यांच्या स्टेज शोंना रसिकांची नेहमीच भरभरून पसंती मिळते. 

ए. आर. रहमान यांनी 2019 मध्ये 94.8 कोटी कमाई केली असून 2018 मधील त्यांची कमाई 66.75 कोटी होती. फोर्ब्सच्या यादीत त्यावेळी ते 11 व्या क्रमांकावर होते तर 2017 मध्ये त्यांनी 57.63 इतकी कमाई केली होती. 

ए. आर. रहमान यांना आज सगळेच ए. आर. रहमान याच नावाने ओळखतात. पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे. पण एका ज्योतिषीच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले. एवढेच नव्हे तर त्यांचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला होता. पण त्यांनी जन्मानंतर काही वर्षांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी स्वतःच्या मर्जीने घेतला होता असे त्यांनी अनेक मुलाखतीत सांगितले आहे.  

Web Title: AR Rahman Birthday Special: AR Rahman is top musician on the 2019 Forbes India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.