तुम्ही ऐकलाय का AR Rahman च्या मुलीचा आवाज? दुबईत केलं परफॉर्म; सगळीकडे रंगलीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 11:53 AM2021-11-27T11:53:25+5:302021-11-27T11:53:56+5:30

Khatija Rahman : २४ वर्षीय खातिजाचं परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यूजर्स खातिजाच्या गायकीचं आणि तिच्या आवाजाचं भरभरून कौतुक करत आहेत.

AR Rahman daughter Khatija sings her debut single farishton at dubai expo 2020 | तुम्ही ऐकलाय का AR Rahman च्या मुलीचा आवाज? दुबईत केलं परफॉर्म; सगळीकडे रंगलीये चर्चा

तुम्ही ऐकलाय का AR Rahman च्या मुलीचा आवाज? दुबईत केलं परफॉर्म; सगळीकडे रंगलीये चर्चा

googlenewsNext

ऑस्कर विजेता म्युझिक कंपोजर आणि गायक ए.आर.रहमानच्या (A.R.Rahman) जादुई संगीताने अनेक वर्षांपासून श्रोत्यांना भुरळ घातली आहे. एआर.रहमान प्रमाणेच त्याची मुलगी खातिजा रहमान (Khatija Rahman) सुद्धा म्युझिक इंडस्ट्रीत आपली छाप सोडण्यासाठी तयार आहे. खातिजाने दुबई एक्स्पोमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने लोकांना सरप्राइज केलं आहे. 

२४ वर्षीय खातिजाचं परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यूजर्स खातिजाच्या गायकीचं आणि तिच्या आवाजाचं भरभरून कौतुक करत आहेत. दुबई एक्स्पोमध्ये खातिजा फिरदौस ऑर्केस्ट्राचा भाग बनली. २० नोव्हेंबरला वर्ल्ड चिल्ड्रेन डे ला खातिजाने परफॉर्मन्स केलं होतं. खातिजाने दुबईत १६ वर्षीय पियानिस्ट Lydian Nadhaswaram सोबत परफॉर्म केलं होतं.

खातिजाने तिचं डेब्यू सिंगल फरिश्तो हे गाणं सादर केलं. हे गाणं तिचे वडील ए.आर. रहमान यांनी कंपोज केलं आहे. म्युझिक कंपोजरने आपल्या यूट्यूबवर मुलीचा हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं की, त्यांच्यासाठी ज्यांनी खातिजा रहमानचं परफॉर्मन्स मिस केलं असेल. वर्ल्ड चिल्ड्रेन्स डे सेलिब्रेट करताना. 

एआर. रहमानने जसा मुलीच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला फॅन्स खातिजाचा आवाज ऐकून थक्क झाले. लोक तिच्या आवाजाचं भरभरून कौतुक करत आहेत. लोकांना तर तिचा आवाज इतका आवडला की, लोक पुन्हा पुन्हा तिचं गाणं ऐकत आहेत. यूजर्सनी या कंपोजिशनचंही कौतुक केलं आहे. 
 

Web Title: AR Rahman daughter Khatija sings her debut single farishton at dubai expo 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.