घटस्फोटानंतर ए. आर. रहमान घेणार करिअरमधून ब्रेक? लेक खतीजा म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 14:40 IST2024-12-08T14:40:25+5:302024-12-08T14:40:48+5:30
ए. आर. रहमान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

घटस्फोटानंतर ए. आर. रहमान घेणार करिअरमधून ब्रेक? लेक खतीजा म्हणाली...
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ए. आर. रहमान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या २९ वर्षानंतर ए. आर. रहमान याने पत्नी सायरा बानो (Saira Bano) पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याची माहिती एक्सवर पोस्ट करत दिली. घटस्फोटोनंतर आता ए. आर. रहमानच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी आणखी एक बातमी समोर येत आहे.
ए. आर. रहमान पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर करिअरमधून ब्रेक घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर त्यांची मुलगी खतिजा रहमान हिने या प्रतिक्रिया दिली. "कृपया अशा निरुपयोगी अफवा पसरवणे थांबवा", असं तिने म्हटलं. पण, करिअरमधून ब्रेक घेणार की नाही, यावर ए. आर. रहमानने भाष्य केलेलं नाही.
रहमान यांनी १९९५ मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. नात्यातील भावनिक तणावामुळे हा निर्णय घेतल्याचे सायरा यांनी सांगितलं. ए. आर. रहमान यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारांमध्ये केली जाते. १९९२ मध्ये रोजा या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या रहमान यांच्याकडे आज सुमारे २१०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. देश-विदेशात त्यांची अनेक आलिशान घरं असून त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.