वडिलांकडून ए.आर.रहमान यांना मिळाला संगीताचा वारसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 12:32 PM2017-01-06T12:32:41+5:302017-01-06T12:34:07+5:30

नादमधूर आणि श्रवणीय संगीताची मेजवानी गायक ए.आर.रहमान यांच्या गायनातून आपल्याला अनुभवायला मिळते. तुम्हाला ठाऊक आहे का रहमान यांना हा ...

AR Rahman's father received a legacy of music! | वडिलांकडून ए.आर.रहमान यांना मिळाला संगीताचा वारसा!

वडिलांकडून ए.आर.रहमान यांना मिळाला संगीताचा वारसा!

googlenewsNext
दमधूर आणि श्रवणीय संगीताची मेजवानी गायक ए.आर.रहमान यांच्या गायनातून आपल्याला अनुभवायला मिळते. तुम्हाला ठाऊक आहे का रहमान यांना हा संगीताचा वारसा कुणाकडून मिळाला? होय, त्यांचे वडील आर.के.शेखर यांच्याकडून रहमान यांना हा वारसा मिळाला होता. १९६६ मध्ये तामिळनाडूच्या चैन्नई या राजधानीत अल्लाह रक्खा रहमान यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मल्याळी चित्रपटांमध्ये शिक्षण देण्याचे काम करत असत. वडीलांच्या जीवनप्रवासात त्यांनी त्यांचा संगीताचा हा अमूल्य ठेवा मुलाला म्हणजेच ए.आर.रहमान यांना देऊ केला. 

रहमानच्या लहानवयातच वडिलांचा मृत्यू :
संगीतकारांनी संगीताचे शिक्षण त्यांचे गुरू धनराज यांच्याकडून घेतले. पण रहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाला. वडीलांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळे रहेमान यांनी घरातील काही वाद्ययंत्र विकावी लागली. वयाच्या ११ व्या वर्षापासून रहमान हे त्यांचे मित्र शिवमणि यांच्यासोबत ‘रहमान बँड्स रूटस’साठी सिंथेसायझर वाजवण्याचे काम करू लागले. चैन्नईच्या ‘नेमेसिस एव्हेन्यू’ बँडच्या स्थापनेत रहमान यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. रहमान तेव्हा पियानो, हार्माेनियम, गिटार वाजवत असत. 



पाश्चिमात्य संगीताची तालीम : 
 रहमान सिंथेसायझरला कला आणि टेक्निक यांचा अदभुत संगम मानतात. बँड ग्रुपमध्ये काम करत असताना त्याला लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळाली. या कॉलेजमधून त्यांनी पश्चिमी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. १९९१ पासून रहमान यांनी स्वत:चा म्युझिक रेकॉर्ड करायला सुरूवात केली. तर १९९२ मध्ये त्यांना दिग्दर्शक मणि रत्नम यांच्याकडून ‘रोजा’ला संगीत देण्याची संधी मिळाली. ‘रोजा’चे संगीत जबरदस्त हिट झाले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी रहमान यांना ‘फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 

२०० कोटींपेक्षा जास्त रेकॉर्ड्सची विक्री :
 रहमान यांच्या गाण्यांचे २०० कोटींपेक्षा जास्त रेकॉर्डिंग विकले गेले आहेत. रहमान हे जगातील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी मानले जातात. त्यांनी १९९७ मध्ये बनवलेल्या ‘वंदे मातरम’ या अल्बमला प्रचंड लाईक्स मिळाले. २००२ मध्ये ‘बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस’ तर्फे ७००० गाण्यांमधून १० प्रसिद्ध गाणे निवडण्यात आले. त्या सर्व्हेक्षणात ‘वंदे मातरम’ला दुसरा क्रमांक मिळाला. या गाण्याची ‘गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रिकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली आहे. 



त्यांचे काही प्रसिद्ध गाणे :
 ‘दिल से’,‘ख्वाजा मेरे ख्वाजा’,‘जय हो’ आदी गाण्यांमुळे रहमान यांची ख्याती झाली. ‘बॉम्बे’,‘रंगीला’,‘दिल से’,‘ताल’,‘जींस’,‘पुकार’, ‘फिजा’, ‘लगान’,‘स्वदेस’,‘जोधा-अकबर’,‘युवराज’,‘स्लमडॉग मिलेनियर’ आणि आता ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले आहे. 

सन्मान व पुरस्कार :
२००० यावर्षी त्यांना ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटासाठी गोल्डन ग्लोब, आॅस्कर आणि ग्रॅमी सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले.  चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याने देशविदेशात प्रसिद्धी मिळवली. रहमान यांना आत्तापर्यंत ४ राष्ट्रीय पुरस्कार, १५ फिल्मफेयर पुरस्कार, दाक्षिणात्य चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 

Web Title: AR Rahman's father received a legacy of music!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.