अरबाजची दुसरी पत्नी शूराने थिएटरमध्ये सगळ्यांसमोरच अभिनेत्याला केलं किस, नेटकरी म्हणाले- "कॅमेरा बघून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:05 IST2024-10-02T17:04:38+5:302024-10-02T17:05:28+5:30
अरबाज आणि शूराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मात्र या दोघांनाही ट्रोल केलं आहे.

अरबाजची दुसरी पत्नी शूराने थिएटरमध्ये सगळ्यांसमोरच अभिनेत्याला केलं किस, नेटकरी म्हणाले- "कॅमेरा बघून..."
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान कायमच चर्चेत असतो. अरबाजच्या बॉलिवूड करिअरपेक्षा त्याच्या पर्सनल आयुष्याचीच जास्त चर्चा रंगलेली पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वीच अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्याशी दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर अनेक ठिकाणी अरबाज आणि शूरा यांना स्पॉट करण्यात आलं होतं. आता अरबाज आणि शूराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अरबाज आणि शूराने एका ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली होती. यादरम्यानचा एक व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अरबाज खानला सगळ्यांसमोरच शूरा किस करताना दिसत आहे. अरबाज आणि शूराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मात्र या दोघांनाही ट्रोल केलं आहे.
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. "किस केल्यानंतर ती कॅमेऱ्यात बघत आहे", "या दोघांचा ड्रामा अजून किती वेळा पाहायचा", "कॅमेरा बघूनच किस केलंय", "व्हिडिओसाठी किस केलं आहे" अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अरबाज आणि शूरा बंदा सिंह चौधरी या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी गेले होते. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धानंतरच्या घटनांवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाची निर्मिती अरबाज खान प्रॉडक्शनने केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये अरबाजने शूराशी निकाह केला. अरबाजने १९९८ साली मलायका अरोराशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर १९ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे.