गोविंदासोबत झालेल्या दुर्घटनेवर अरबाज खान अन् अर्शद वारसीची प्रतिक्रिया, म्हणाले, "खूपच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:27 IST2024-10-01T17:25:48+5:302024-10-01T17:27:59+5:30
अभिनेता गोविंदासोबत आज पहाटे मोठी दुर्घटना झाली. त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेली जी त्याच्या पायाला लागली

गोविंदासोबत झालेल्या दुर्घटनेवर अरबाज खान अन् अर्शद वारसीची प्रतिक्रिया, म्हणाले, "खूपच..."
अभिनेता गोविंदासोबत (Govinda) आज पहाटे मोठी दुर्घटना झाली. त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेली जी त्याच्या पायाला लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदाने रुग्णालयातून एक ऑडिओ क्लिप शेअर करत गोळी काढल्याचं आणि आपण सुखरुप असल्याची माहिती दिली. या घटनेवर नुकतंच अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अरबाज खान (Arbaz Khan) त्याच्या आगामी सिनेमाच्या इव्हेंटसाठी मुंबईत होता. सिनेमाच्या कलाकारांसोबत ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी अर्शद वारसी (Arshad Warsi) मुख्य अभिनेता असल्याने हजर होता. दरम्यान माध्यमांमधून अरबाज आणि अर्शद वारसीला गोविंदाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर अरबाज म्हणाला, "खूप दुर्दैवी घटना आहे. काही वेळापूर्वीच हे घडलं त्यामुळे आम्हाला फारशी माहिती नाही. पण गोविंदाला लवकर बरं वाटावं, तो सुखरुप असावा अशी आम्ही प्रार्थना करतो. त्याला काहीही होणार नाही आपल्या सर्वांचं प्रेम, प्रार्थना त्याच्यासोबत आहे."
तर अर्शद वारसी म्हणाला, "खूपच दुर्दैवी घटना आहे. खूप वाईट वाटतंय. खूपच विचित्र योगायोग आहे हा असं कोणासोबतच व्हायला नको."
गोविंदा सध्या अंधेरी येथीली क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार घेत आहे. पहाटे कोलकत्याला जाण्यासाठी निघाला असता कपाटातून त्याने बंदूक काढली. मात्र ती त्याच्या हातून खाली पकडली. बंदुकीचं लॉक खुलंच असल्याने गोळी झाडली गेली आणि हा अपघात झाला. त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली आहे आणि शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो सुखरुप आहे.