अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने रस्त्यात गाडी थांबवून केलं असं काही, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:39 IST2022-03-10T17:12:03+5:302022-03-10T17:39:11+5:30
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने रस्त्यात गाडी थांबवून केलं असं काही, व्हिडीओ झाला व्हायरल
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. जॉर्जिया केवळ अरबाजच्याच नाही तर त्याच्या कुटुंबाच्याही खूप जवळ आहे. जॉर्जिया अनेकदा अरबाजच्या फॅमिली फंक्शन्समध्ये दिसते. त्याचबरोबर दोघेही अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम स्पेंट करताना दिसतात. अभिनयासोबतच जॉर्जिया सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या फोटोंसह इन्स्टा रील शेअर करते. दरम्यान, जॉर्जियाचा एका व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे.
जॉर्जिया एंड्रियानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जॉर्जिया अचानक रस्त्यावर कार थांबवते आणि डान्स करते. जॉर्जिया आधी तिच्या कारमधून खाली उतरते आणि नंतर एका इंग्रजी गाण्यावर नाचू लागते. यावेळी जॉर्जियाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने ब्लू जॅकेट आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. यासोबतच तिने मॅचिंग कॅप देखील कॅरी केली आहे ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. जॉर्जियाचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जातो आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ अनेकवेळा पाहिला गेला आहे. चाहते सतत त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
अरबाज खान मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयात २२ वर्षांचे अंतर आहे. अरबाज 52 वर्षांचा आहे, तर जॉर्जिया 30 वर्षांचा आहे. अरबाज जॉर्जियाला डेट करतो आहे. तर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.