Video : लॉकडाऊनमध्ये अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाने केली त्याची शेविंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:25 IST2020-04-22T17:18:58+5:302020-04-22T17:25:39+5:30
हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Video : लॉकडाऊनमध्ये अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाने केली त्याची शेविंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. बॉलिवूडचे सगळे सेलिब्रेटी सध्या आपआपल्या घरातच आहेत. सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाने एक मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये जॉर्जिया अरबाज खानची शेविंग करताना दिसतेय. जॉर्जिया घरात बसून बसून कंटाळली आहे. याच दरम्यान ती उठून अरबाजकडे जाते तर अरबाज तिला सोफ्यावर बसून झोपलेला दिसतो. यानंतर जॉर्जिया शेविंग किट घेऊन थेट अरबाजची दाढी करायला सुरुवात करते आणि त्याला या गोष्टीचा थांग पत्तादेखील लागत नाही. अरबाज जेव्हा झोपून उठतो त्यावेळी त्याला स्वत:ची क्लीन शेव दिसते. ऐवढेच नाही तर अरबाज थम दाखवून जॉर्जियाचे कौतुक देखील करतो.
जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता तिने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लवकरच ती सिनेमात देखील दिसणार आहे. अरबाजबद्दल बोलायचे झाले तर दबंग3 मध्ये दिसला होता.