अरबाज खानच नव्हे ‘हे’ सेलिब्रिटीही अडकले बेटिंगच्या जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 01:38 PM2018-06-02T13:38:24+5:302018-06-02T19:08:24+5:30

गेल्या काहीकाळापासून क्रिकेट आणि बेटिंग हे जणू काही समीकरणच बनले आहे. पाकिस्तान, भारत, दक्षिण आफ्रिका यांसह अनेक देशांमधील खेळाडूंवर ...

Arbaaz Khan not only celebrates 'Hey' celebrity trapped in betting! | अरबाज खानच नव्हे ‘हे’ सेलिब्रिटीही अडकले बेटिंगच्या जाळ्यात!

अरबाज खानच नव्हे ‘हे’ सेलिब्रिटीही अडकले बेटिंगच्या जाळ्यात!

googlenewsNext
ल्या काहीकाळापासून क्रिकेट आणि बेटिंग हे जणू काही समीकरणच बनले आहे. पाकिस्तान, भारत, दक्षिण आफ्रिका यांसह अनेक देशांमधील खेळाडूंवर बेटिंगचा डाग लागला आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलदेखील यापासून सुटले नाही. आयपीएलमध्ये केवळ खेळाडूच नव्हे तर उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही बेटिंगच्या जाळ्यात अडकले. बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अरबाज खानने याप्रकरणी कबुली दिल्याने पुन्हा एकदा बेटिंगचा मुद्दा समोर आला आहे. मात्र बेटिंगमध्ये अडकलेला अरबाज हा पहिलाच सेलिब्रिटी नसून, यापूर्वीही अनेकांची नावे समोर आली आहेत, त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...



बिंदू दारासिंग
बºयाच चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारा आणि बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन-३ चा विनर असलेला बिंदू दारासिंग यालादेखील बेटिंग प्रकरणी २०१३ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. बिंदूवर खेळाडू आणि बुकी यांच्यात समेट घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी तो प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित राहून हे सर्व सूत्र फिरवित असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. 



शिल्पाचा पती राज कुंद्रा
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हादेखील बेटिंग प्रकरणात अडकला होता. राज राजस्थान रॉयल्स संघाचा मालक होता. राज आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी बराच काळ संशयाच्या भोवºयात होता. लोढा समितीने त्याला बेटिंगमध्ये दोषी ठरविले होते. तसेच त्याला क्रिकेटशी संबंधित कुठल्याच बाबींमध्ये सहभागी न होण्याचे आदेश दिले होते. तसेच त्याच्या संघावर दोन वर्षांसाठी बंदी लावली होती. पुढे दोन वर्षांच्या बंदीनंतर ११ मे २०१८ रोजी राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. 



सोनू जालानचे बॉलिवूड कनेक्शन 
आयपीएल बेटिंग रॅकेटचा सूत्रधार असलेला संशयित सोनू जालान ऊर्फ सोनू मलाड याचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याला जेव्हा २९ मे रोजी अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या घरातून एक डायरी पोलिसांना मिळाली. त्यावरूनच अरबाज खानचे नाव समोर आले. त्याचबरोबर बºयाचशा बॉलिवूड सेलिब्रिटींची नावेही त्यात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोनूने ठाणे पोलिसांना सांगितले की, अरबाज बेटिंगमध्ये २.८० कोटी रूपये हारला. त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी मी त्याला धमकावलेही. दरम्यान, अरबाजनेही गेल्या सहा वर्षांपासून आपण बेटिंग खेळत असल्याचे आपल्या कबुलीजबाबात सांगितले. 

Web Title: Arbaaz Khan not only celebrates 'Hey' celebrity trapped in betting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.