मलायका- अरबाजच्या घटस्फोटाच्यावेळी मुलगा अरहानची ही रिअॅक्शन, अरबाजने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 02:00 PM2019-12-23T14:00:53+5:302019-12-23T14:49:04+5:30
अरबाज म्हणाला त्यावेळी आमचा मुलगा अरहान15 वर्षांचा होता.
अरबाज खान आणि मलायका अरोराने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या जवळपास १९ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त ऐकून चाहते हैराण झाले होते.घटस्फोट घेतल्यानंतर आजही दोघांमध्ये मैत्रिचे नातं टिकून आहे. हिन्दुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार अरबाजने घटस्फोटानंतर 3 वर्षांनी आपली बाजू मांडली आहे. अरबाज म्हणाला, '' हा निर्णय घेणे खूप कठीण होता मात्र तो गरजेचा होता. त्यावेळी आम्हाला हा निर्णय घेणे योग्य वाटले.'' घटस्फोट घेताना मुलगा अरहानची प्रतिक्रिया काय होती असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, त्यावेळी माझा मुलगा 15 वर्षांचा होता आणि त्याला सगळं समजत होते. त्यामुळे त्याला जास्त समजवण्याची गरज नाही लागली.
मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते. जॉर्जियाचे नाव फॅशन जगतात खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता ती तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे.
अरबाज व जॉर्जियाने त्यांच्या नात्याची कबुली दिली असली तरीपण लग्नाचे वृत्त नाकारले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अरबाजला लग्नाविषयी विचारण्यात आलं त्यावेळी तो नाराज झाला होता.
इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजनं त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. सध्या अरबाज त्याचा आगामी चित्रपट दबंग ३च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान दिलेल्या मुलाखतीत जेव्हा त्याला गर्लफ्रेंड जॉर्जियाशी लग्न करण्याच्या चर्चांविषयी विचारण्यात आला त्यावेळी तो चिडला.