'सुपरस्टार भावासारखं आम्हाला यश मिळालं नाही' अरबाज खानने आता केलं नेपोटिझमवर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:16 PM2024-03-12T12:16:27+5:302024-03-12T12:16:48+5:30
अरबाज खानने सलमानविषयी केलं वक्तव्य
बॉलिवूडमध्ये नेपोटिझ हा मुद्दा कायम चर्चेत असतो. अनेक सेलिब्रिटी यावर खुलेपणाने चर्चा करतात. कोणी याला विरोध करतं तर कोणी याचा स्वीकार करतं. आता सलमान खानचा भाऊ, दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. तुमचे आई वडील ज्या क्षेत्रात आहे तिथे तुम्हाला जरा सोप्पं होतं पण त्यातून तुमचं करिअर बनेलच हे गरजेचं नाही.
अरबाजने 1996 साली 'दरार' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. पण त्याला भाऊ सलमान खान आणि वडील सलीम खान यांच्यासारखं यश मिळालं नाही. Timeout with Ankit सोबतच्या पॉडकास्टमध्ये अरबाज खान म्हणाला, "तुमचे वडील ज्या प्रोफेशनमध्ये आहेत तिथे तुमच्यासाठी काही दरवाजे नक्कीच खुले होतात. जर तुमचे वडील डॉक्टर किंवा वकील आहेत तर तुम्हाला त्या क्षेत्रातील इतर लोकांपर्यंत पोहोचणं सोप्पं होतं. त्याचप्रकारे अभिनेता म्हणून आम्हाला कोणालाही भेटणं शक्य आहे. कोणाला भेटणं जरी सोप्पं असलं तरी काम मिळेलच हे गरजेचं नाही."
तो पुढे म्हणाला, "लोकांना वाटतं की आम्ही फिल्म इंडस्ट्रीत आहोत तर काम मिळेलच. सहज करिअर बनेल. करिअर २५ वर्षांचं असतं. तुम्हाला एखादी संधी मिळेलही पण आम्ही दोघंही इतर सुपरस्टार्सप्रमाणे किंवा भाऊ सलमानप्रमाणे यश मिळवू शकलो नाही. पण आम्ही काम करत आहोत. कोणी कोणाला फेवर करत नाही. जर कोणी यश मिळवलं असेल तर हे बोलणं चुकीचं आहे की त्याने नेपोटिझममुळे यश मिळवलं. एका सुपरस्टारवर अशीही वेळ येते जेव्हा त्याचे १० सिनेमे फ्लॉप होतात. जर तो स्वत:साठी काही करु शकत नाहीए तर तुमच्यासाठी कुठून करेल. प्रत्येक जण एका कालावधीनंतर कोणाचीही मदत न घेता स्वत:च्या हिंमतीवर काम करतो."