Arbaaz Khan on Giorgia Andriani : गर्लफ्रेन्ड जॉर्जियात असं काय पाहिलं? अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला, ती खरंच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:39 PM2022-11-15T17:39:29+5:302022-11-15T17:39:36+5:30

Arbaaz Khan on Giorgia Andriani : अरबाज व मलायका दोघंही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबत खुश्श आहे तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे...

arbaaz khan talk about girlfriend giorgia andriani | Arbaaz Khan on Giorgia Andriani : गर्लफ्रेन्ड जॉर्जियात असं काय पाहिलं? अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला, ती खरंच...

Arbaaz Khan on Giorgia Andriani : गर्लफ्रेन्ड जॉर्जियात असं काय पाहिलं? अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला, ती खरंच...

googlenewsNext

Arbaaz Khan on Giorgia Andriani : अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) व मलायका अरोरा यांचं नातं मे 2017मध्ये  संपलं. 19  वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकानं एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे कायदेशीर मार्गाने घटस्फोटही घेतला. आता दोघंही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबत खुश्श आहे तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. खरं तर अरबाज त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलत नाही. पण ताज्या मुलाखतीत तो भरभरून बोलला. अगदी त्याची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया एंड्रियानीबद्दलही (Giorgia Andriani ) त्याने अनेक खुलासे केलेत. त्याच्या आणि जॉर्जियाच्या वयातील फरकावरही तो बोलला.

जॉर्जियात काय पाहिलं....?
जॉर्जियात असं काय पाहिलंस की तू तिच्या प्रेमात पडलास? असा प्रश्न सिद्धार्थ कननने अरबाजला केला. यावर अरबाज चक्क लाजताना दिसला. ती फारच ‘जिंदादिल’ मुलगी आहे. तिची एनर्जी आणि तिचा सतत आनंदी स्वछंदी स्वभाव पाहून मी तिच्याकडे आकर्षित झालो. ती खरंच भारी आहे. तिच्याकडून मला सकारात्मक ऊर्जा मिळते, यामुळे मी आनंदी राहतो, असं त्याने सांगितलं.

 वयाचं अंतर आम्हाला कधीच जाणवलं नाही....
अरबाज आणि जॉर्जिया  यांच्या वयात जवळपास 22 वर्षाचं अंतर आहे.  अरबाज खान 55 वर्षांचा आहे. तर जॉर्जिया 33 वर्षांची आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं गेलं आहे. पण अरबाजला त्याची पर्वा नाही. यावर तो म्हणाला, ‘आमच्या दोघांच्या वयात खूप अंतर आहे. पण आम्हाला ते कधीच जाणवलं नाही. मी कधी कधी तिला याबाबत विचारतो देखील. पण खरं सांगू वय हा  फारच  शुल्लक मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात असता, तेव्हा तुम्ही फार पुढचा विचार करत नाही. पण जितक्या दीर्घकाळ तुम्ही त्या नात्यात असता, तेव्हा तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं देणं भाग पडतं. माझ्या मते, सध्या आम्ही त्या वळणावर आहोत, जिथे हे नातं आणखी पुढे कसं न्यायचं, यावर आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे सध्या तरी याबद्दल बोलण घाईचं ठरेल.

 मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाच्या प्रेमात आहे. दोघंही अनेकदा   सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये दिसतात. जॉर्जियाचं नाव फॅशन जगतात खूप मोठें नाव आहे. तिने 30हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचं नाव आहे.
 

Web Title: arbaaz khan talk about girlfriend giorgia andriani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.