कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा ...! अरबाज खानची सटकली, अभिनव कश्यपच्या आरोपांना देणार सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:28 AM2020-06-18T11:28:52+5:302020-06-18T11:30:35+5:30

सलमान खान व त्याच्या कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, असे तो म्हणाला होता.

arbaaz khan will take legal action against dabang director abhinav kashyap over his allegations | कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा ...! अरबाज खानची सटकली, अभिनव कश्यपच्या आरोपांना देणार सडेतोड उत्तर

कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा ...! अरबाज खानची सटकली, अभिनव कश्यपच्या आरोपांना देणार सडेतोड उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनवच्या पोस्टनंतर  खानचे वडील सलीम खान यांनी यावर जळजळीत शब्दांत उत्तर दिले होते.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला असताना ‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यपने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत खळबळ उडवली होती. सलमान खान व त्याच्या कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, असे तो म्हणाला होता. त्याच्या या आरोपांनी खळबळ माजली असताना आता खान कुटुंबाने अभिनवविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरु केली आहे.
हिंदुस्तान टाइम्सशी दिलेल्या मुलाखतीत खुद्द अरबाज खानने याबद्दल माहिती दिली.

काय म्हणाला अरबाज
आम्ही 2012 मध्ये ‘दबंग 2’ सुरु करण्यापूर्वी अभिनवसोबत चर्चा केली होती. यानंतर त्याच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही.   कालपरवा केलेल्या पोस्टआधीही त्याने अशीच एक पोस्ट केली होती. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. ‘दबंग2’नंतर आमचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आले होते. आता त्याने पुन्हा नवी पोस्ट केली आहे. आता आम्ही याविरोधातही कायदेशीर कारवाई करू, असे अरबाजने सांगितले.

सलीम खान भडकले  
अभिनवच्या पोस्टनंतर  खानचे वडील सलीम खान यांनी यावर जळजळीत शब्दांत उत्तर दिले होते.
बॉम्बेटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत  सलीम यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती.  ‘हो आम्हीच सगळ्यांचे करिअर संपवले. आधी त्याचे सिनेमे पाहा, मग बोला. त्याने माझेही नाव घेतले. कदाचित त्याला माझ्या वडिलांचे नाव माहित नाही. नाही तर त्याने त्यांचेही नाव घेतले असते. माझ्या वडिलांचे नाव राशीद खान आहे. त्याने त्यांचेही नाव घ्यावे. माझे आजोबा, पणजोबांचेही नाव घ्यावे. त्याला बोलू द्या. त्याच्याबद्दल बोलून मी माझा वेळ व्यर्थ करू इच्छित नाही़,’ असे सलीम खान म्हणाले होते.

काय होते अभिनवचे आरोप
‘दबंग’ मेकिंगच्या वेळी मला अरबाज खान, सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी फक्त मला घाबरवले, धमकावले नाही तर त्यांनी माझे करिअर कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केला होता. अरबाने माझा ‘दबंग’ नंतर दुस-या सिनेमाचा प्रोजेक्ट सुद्धा आपल्या फॅमिली पावरचा वापर करून माझ्याकडून काढून घेतला होता. ज्यामुळे माझे खूप नुकसान झाले होते. दबंगच्या रिलीजच्या वेळी माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आणि माझी नकारात्मक पब्लिसिटी केली गेली. माझ्या पर्सनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार आले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमकी देण्यात आली. मी त्यावेळी पोलीसांत तक्रार सुद्धा केली होती.  जे लोक आपली मनमनी करून कलाकारांनी असे वर्तन करतात. त्यांचा पदार्फाश करणे गरजेचे आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान, असे अभिनवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
  

Web Title: arbaaz khan will take legal action against dabang director abhinav kashyap over his allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.