अरबाज खानची गर्लफ्रेड जॉर्जिया एंड्रियानीने चक्क मराठीत दिले उत्तर, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल 'लय भारी' !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:28 IST2021-06-15T13:24:14+5:302021-06-15T13:28:36+5:30
जॉर्जिया एंड्रियानीचे एवढे स्पष्ट उच्चा ऐकून तिचे फॅन्स सुद्धा थक्क झाले आहेत. तिचा हा मराठी बाणा पाहून जॉर्जियाने मराठी शिकून मोठी भूमिका मराठी सिनेमात साकारावी अशी तिच्या फॅन्सची इच्छा असेल.

अरबाज खानची गर्लफ्रेड जॉर्जिया एंड्रियानीने चक्क मराठीत दिले उत्तर, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल 'लय भारी' !
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जॉर्जिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे.
बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर इटालियन ब्युटी जॉर्जिया एंड्रियानीने बर्याच गोष्टी शिकल्या आहेत, ती केवळ अस्खलितपणे हिंदी बोलते असे नाही तर तिच्या पंजाबी भाषेमध्येही चांगली पकड आहे. आता ती मराठी शिकत असल्याचेही अभिनेत्रीने उघड केले आहे.जॉर्जिया एंड्रियानी नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसह तिचे खास व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच जॉर्जिया एंड्रियानी इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असताना, तिच्या एका चाहत्याने विचारले "आपको मराठी आती है" ज्याचे उत्तर अभिनेत्रीने व्हिडीओ बनवून दिले, व्हिडीओत तिने चाहत्याला चक्क मराठीत उत्तर दिले.
"मला मराठी येत नाही, पण मी शिकत आहे" असे तिने सांगितले.मराठी भाषा शिकण्याचा आणि ती लवकरात लवकर आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिच्या या व्हिडीओवरुन स्पष्ट होते. विशेष म्हणजे जॉर्जिया एंड्रियानीचे एवढे स्पष्ट उच्चा ऐकून तिचे फॅन्स सुद्धा थक्क झाले आहेत. तिचा हा मराठी बाणा पाहून जॉर्जियाने मराठी शिकून मोठी भूमिका मराठी सिनेमात साकारावी अशी तिच्या फॅन्सची इच्छा असेल.
जॉर्जियाने दक्षिणेत “करोलिन आणि कामाक्षी” या वेब सिरीयस मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेत्री जॉर्जिया २०२० मध्ये मिका सिंगबरोबर त्याच्या संगीत अल्बम "रूप तेरा मस्ताना" मध्ये झळकली होती . ती लवकरच श्रेयस तळपदे सोबत “वेलकम टू बजरंगपूर” चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्तही काही आगामी प्रोजेक्टवर ती काम करत असून लवकरच जाहीर करणा आहे.