VIDEO: अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया आहे खूप ग्लॅमरस आणि हॉट, हे आहे तिच्या फिटनेसचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 13:54 IST2020-08-25T13:53:57+5:302020-08-25T13:54:24+5:30
इटालियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीदेखील आपल्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळे चर्चेत येत असते.

VIDEO: अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया आहे खूप ग्लॅमरस आणि हॉट, हे आहे तिच्या फिटनेसचे रहस्य
हल्ली सर्वच कलाकार फिटनेसला महत्त्व देताना दिसतात. त्यामुळे काही अभिनेत्री त्यांच्या फिटनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणजेच इटालियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीदेखील आपल्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळे चर्चेत येत असते.
जॉर्जिया अँड्रियानी फिटनेस फ्रीक असून ती वर्कआउट करायला कधीच विसरत नाही. लॉकडाउनचा जॉर्जियाने पूरेपूर वापर करत फिटनेसकडे जास्त लक्ष दिले आहे. ती सांगते की फिटनेस खूप महत्त्वाचे आहे, जे आपल्याला सुखी, मजबूत आणि निरोगी ठेवते. फिटनेस आपल्या सर्वांच्या धकाधकीच्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहे. एक फिट व्यक्ती आहे आणि तो नेहमीच सक्रिय राहतो, तर जे लोक शारीरिक श्रम करीत नाहीत ते सुस्त असतात.
जॉर्जिया लवकरच 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
यात श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि तिग्मांशू धूलिया मुख्य भूमिकेत आहेत.
याशिवाय अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वरियर अभिनित बहुप्रतिक्षित 'श्रीदेवी बंगल्या'मध्ये आयटम नंबर साँग करताना दिसणार आहे.