रेखा यांचा मिस्ट्री मॅन कोण ? अर्चना पूरण सिंहनं केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 10:25 IST2024-12-08T10:25:11+5:302024-12-08T10:25:53+5:30
नुकतंच 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये रेखा यांनी हजेरी लावली.

रेखा यांचा मिस्ट्री मॅन कोण ? अर्चना पूरण सिंहनं केला मोठा खुलासा
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्याची जादू गेली कित्येक वर्ष ओसरत नाहीये. नवोदित अभिनेत्रींना लाजवेल असं सौंदर्य त्यांना लाभलं आहे. आपल्या अभिनय तसेच सौंदर्याच्या जोरावर त्या गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. फिल्मी आयुष्यासोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं आहे. नुकतंच 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये रेखा यांनी हजेरी लावली.
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये कपिलच्या पुर्ण टीमसोबत रेखा यांनी मस्ती केली. या एपिसोडमधील काही खास फोटो अर्चना पुरन सिंग हिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी तिने रेखा यांच्या आयुष्यातील 'मिस्ट्री मॅन'बद्दल खुलासा केला.
अर्चनाने पोस्टमध्ये लिहलं, "जेव्हा मी रेखा यांचा 'सावन भादों' सिनेमा पाहिला. तेव्हा मी मुंबईला जाण्याची फारशी आशा नसलेली लहान शहरातील मुलगी होते… आणि रेखाजींना प्रत्यक्ष भेटण्याची आशाही नव्हती. आणि त्यानंतर अनेक वर्षांनी मी त्यांच्यासोबत 'लडाई' सिनेमामध्ये काम केलं. रेखा यांनी सिनेमाच्या सेटवर मला मेकअप रुममध्ये बोलावलं. त्यांनी मला मेकअप आणि नकली पापण्या लावायला शिकवलं. आयलॅशेजचं बॉलिवूडमधील ट्रेन्डचं श्रेय देखील रेखा यांना जातं…मी आणि रेखा फिल्म सीटीच्या लॉनमध्ये प्रचंड गप्पा मारायचो. मला आजही लक्षात आहे त्या कायम एका व्यक्ती बद्दल बोलत असायच्या. जेव्हा मी त्यांना त्या व्यक्तीबद्दल विचारलं... तर म्हणाल्या त्या व्यक्तीबद्दल तुला काहीही माहिती नाही. रेखा खरंच कमाल आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेणे खूप आनंददायक आहे".
रेखा यांच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. पण, वर्षानंतर, रेखा लंडनमध्ये असताना, त्यांच्या पतीने एक सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. १९९३ मध्ये रेखां यांनी अभिनेता विनोद मेहरासोबत लग्न केल्याचे म्हटले जात होते, परंतु २००४ मध्ये सिमी ग्रेवालला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे लग्न नाकारले आणि विनोद मेहरा यांना आपला शुभचिंतक म्हटले. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची 'अधुरी प्रेम कहाणी' तर जगजाहीर आहे. अमिताभ यांनी कधीच रेखावरचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं नाही. मात्र रेखा अनेकदा नॅशनल टेलिव्हिजनवर बिग बींविषयी बोलल्या आहे.