सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चा टिजर बघण्यास तुम्ही तयार आहात काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 09:10 AM2017-04-14T09:10:34+5:302017-04-14T14:42:18+5:30

२०१७ या वर्षाचा मोस्ट अवेटेड ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाची सलमान खानच्या चाहत्यांना जबरदस्त आतुरता आहे. कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ...

Are you ready to see the tweet of Salman Khan's 'Tuliite'? | सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चा टिजर बघण्यास तुम्ही तयार आहात काय?

सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चा टिजर बघण्यास तुम्ही तयार आहात काय?

googlenewsNext
१७ या वर्षाचा मोस्ट अवेटेड ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाची सलमान खानच्या चाहत्यांना जबरदस्त आतुरता आहे. कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाविषयी काहीतरी घडामोडी समोर याव्यात यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. आता आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा टिजर लवकरच रिलीज केला जाणार आहे. 



कबीर आणि सलमान या जोडीने यापूर्वी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. असो, ‘ट्यूबलाइट’विषयी बोलायचे झाल्यास हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सलमान या ईदलादेखील ‘ट्यूबलाइट’मधूनही त्याच्या फॅन्सना चांगली ‘ईदी’ देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या सलमानच्या फॅन्सला या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरता लागली आहे. मात्र यासाठी त्याच्या फॅन्सला पुढच्या महिन्याची वाट बघावी लागणार आहे. होय, या चित्रपटाचा ट्रेलर मे महिन्यात रिलीज केला जाणार आहे. 

डीएनएच्या रिपोर्टनुसार कबीर खानने सांगितले की, आम्ही या चित्रपटाचे टीजर लवकरच रिलीज करणार आहोत. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात ‘ट्यूबलाइट’चे टिजर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, तर ट्रेलर मे महिन्यात रिलीज केले जाणार आहे. पुढे बोलताना कबीरने सांगितले की, लोक मला नेहमीच विचारत आहेत की, ट्रेलर रिलीज करण्यास ऐवढा विलंब का केला जात आहे. मात्र मला प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची आतुरता निर्माण करायची असल्याचे त्याने स्पष्ट केले. 



चित्रपटात भारत - इंडो युद्धाप्रसंगीची कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटात सोहोल खानचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रमोशनसाठी चित्रपटातील अभिनेत्री जू जू हीदेखील सहभागी होणार आहे. जू जू हिच्याविषयी सांगताना कबीर खानने म्हटले की, तिच्या भूमिकेमुळे चित्रपटाला एक वजन प्राप्त झाले आहे. तिच्या भूमिकेला एक स्पेशल टच देण्यात आला आहे. थोडक्यात ती या चित्रपटाचा श्वास आहे. प्रेक्षकांना तिची भूमिका आवडेल अशी मला अपेक्षा आहे. हा चित्रपट २३ जून रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Are you ready to see the tweet of Salman Khan's 'Tuliite'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.