मलायका अरोराने घटस्फोटानंतरही या कारणामुळे शेअर केला अरबाज खानसोबतचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:02 IST2019-08-06T20:01:22+5:302019-08-06T20:02:55+5:30
मलायकाने अरबाजसोबतचा तिचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिने अरबाजसोबतचा हा फोटो पोस्ट करण्यामागे एक खास कारण आहे.

मलायका अरोराने घटस्फोटानंतरही या कारणामुळे शेअर केला अरबाज खानसोबतचा फोटो
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट होऊन काही महिने झाले असून ते दोघे आता जुन्या गोष्टी विसरून आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अरबाज सध्या त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत फिरताना दिसत आहे तर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा आहे. त्या दोघांनीही त्यांचे नाते आता सगळ्यांसमोर मान्य देखील केले आहे. आता मलायकाने अरबाजसोबतचा तिचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिने अरबाजसोबतचा हा फोटो पोस्ट करण्यामागे एक खास कारण आहे.
मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मलायका, अरबाज आणि त्यांचा मुलगा अरहानचा एक जुना फोटो पोस्ट केला असून या फोटोत ते तिघेही खूपच छान दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करून अरबाज आणि अरहानमध्ये खूप साऱ्या गोष्टीत साम्य असल्याचे तिला सांगायचे असल्याचे या फोटोच्या कॅप्शनमधून आपल्याला जाणवत आहे. तिने या फोटोसोबत लिहिले आहे की, अरहान तू अगदी तुझ्या वडिलांची कॉपी आहेस...
अर्जुन आणि मलायका नात्यात असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. ते दोघे अनेकवेळा एकत्र दिसत असून ते मीडियासमोर फोटोसाठी एकत्र पोझ देखील देत असत. पण सुरुवातीला त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. मात्र अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर ते दोघे न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तिथले फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले. हे फोटो खूप व्हायरल झाले होते.
मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत होत्या. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी अर्जुनने मलायकाच्या वडिलांची आणि बहिणीची भेट घेतल्यामुळे या चर्चांना ऊत आले होते. पण अद्याप तरी आम्ही लग्नाचा विचार केला नसल्याचे मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.