अर्जून-अंशुला आईच्या आठवणीने व्याकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2016 02:40 AM2016-03-26T02:40:07+5:302016-03-25T19:46:24+5:30
बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आणि त्याची बहीण अंशुला हे दोघेही आज शुक्रवारी आपल्या स्वर्गीय आईला श्रद्धांजली वाहताना दिसले. चार ...
ब लिवूड अभिनेता अर्जून कपूर आणि त्याची बहीण अंशुला हे दोघेही आज शुक्रवारी आपल्या स्वर्गीय आईला श्रद्धांजली वाहताना दिसले. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अर्जून-अंशुलाची आई मोना कपूर यांचे निधन झाले होते. अर्जून व अंशुला आईच्या आठवणीने व्याकूळ झालेले दिसले. दोघांनीही आईसोबतचे बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. शिवाय मनाला स्पर्शून जाणारा संदेशही त्याखाली लिहिला. मोना कपूर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कर्करोगाशी लढत असतानाच मोना यांचे २५ मार्च २०१२ रोजी निधन झाले होते. १९९६ मध्ये मोना यांना घटस्फोट दिल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी विवाह केला होता.
It's been 4 yrs mom but thank u fr holding my hand & walking me thru this difficult life hope u happy wherever u are
It's been 4 yrs since we've laughed together, since you've held my hand, hugged me, or wiped my tears. Miss you ma