Video: "धक्काबुक्की का करताय?"; अर्जुन कपूरचा संताप अनावर; 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरदरम्यान काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 09:32 IST2025-01-25T09:30:45+5:302025-01-25T09:32:41+5:30

अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यात तो मीडियावर भडकलेला दिसतोय (arjun kapoor)

arjun kapoor angry on media that pushed him at sky force premiere | Video: "धक्काबुक्की का करताय?"; अर्जुन कपूरचा संताप अनावर; 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरदरम्यान काय घडलं?

Video: "धक्काबुक्की का करताय?"; अर्जुन कपूरचा संताप अनावर; 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरदरम्यान काय घडलं?

अर्जुन कपूर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. २०२४ ला आलेल्या 'सिंघम अगेन' सिनेमात खलनायकाची भूमिका साकारुन अर्जुनने सर्वांची वाहवा मिळवली. अर्जुन कायमच इतर कलाकारांच्या प्रिमियरला हजेरी लावून त्यांना सपोर्ट करताना दिसतो. अशातच अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो समोर असलेल्या पापाराझींवर चांगलाच भडकलेला दिसतोय. 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरवेळेस काय घडलं? जाणून घ्या

'स्काय फोर्स'च्या प्रिमियरदरम्यान अर्जुनचा राग अनावर

सोशल मीडियावर 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात दिसतं की, अर्जुन सिनेमा पाहण्यासाठी येतो. तेव्हा समोर उभे असलेले पापाराझी आणि मीडिया गडबड करताना दिसतात. त्यामुळे अर्जुनलाही धक्काबुक्की होते. अर्जुन सर्वांना सांगतो की, "मला उशीर झालाय हे मी तुम्हाला सांगितलंय त्यात तुम्ही धक्काबुक्की करताय. ही चुकीचं आहे ना?" असं म्हणत वैतागून अर्जुन निघून जातो.


अर्जुन कपूरचं वर्कफ्रंट

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून अर्जुनला समर्थन दिलं असून पापाराझींच्या वर्तवणुकीवर ताशेरे ओढले आहेत. अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, २०२४ मध्ये दिवाळीत आलेल्या 'सिंघम अगेन' या सिनेमात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. याशिवाय अर्जुनचा भूमी पेडणेकरसोबत 'मेरे हसबंड की बिवी' हा सिनेमा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Web Title: arjun kapoor angry on media that pushed him at sky force premiere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.