Malaika Arora, Arjun Kapoor : तुमच्या कर्माची फळं..., मलायकाच्या फेक प्रेग्नंसी न्युजवर पुन्हा भडकला अर्जुन कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 05:03 PM2022-12-01T17:03:25+5:302022-12-01T17:03:42+5:30
Malaika Arora, Arjun Kapoor : काल भलतंच घडलं. होय, मलायका प्रेग्नंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी एका मीडिया हाऊसने दिली आणि ही बातमी बघून अर्जुन कपूरचा पारा चढला...
मलायका अरोरा (Malaika Arora ) व अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडचं ट्रेंडिंग कपल आहे. या ना त्या कारणानं या कपलची चर्चा सुरूच असते. काल मात्र भलतंच घडलं. होय, मलायका प्रेग्नंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी एका मीडिया हाऊसने दिली आणि ही बातमी बघून अर्जुन कपूरचा पारा चढला. ही खोटी बातमी पेरणाऱ्यांना त्याने चांगलंच सुनावल. सोशल मीडियावर त्याने आपला संताप व्यक्त केला. पण अद्यापही अर्जुनचा राग शांत झालेला नाही. आज त्याने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.
‘प्रत्येकाला आपल्या कर्माची फळ मिळतात. आयुष्यभर तुम्ही इतर लोकांशी वैर करू शकत नाही. तुम्ही कोण आहात? याचा मला फरक पडत नाही. तुम्ही जसं वागणार तसंच तुम्हाला सगळं परत मिळणार. उशीरा का हाईना ब्रम्हांड तुम्हाला तुमच्या कर्माची फळं देणारच....,’अशा आशयाची इन्स्टा स्टोरी अर्जुनने आज शेअर केली. अर्जुन कपूरचा राग अद्यापही शांत झालेला नाही, हेच त्याच्या या पोस्टवरून वाटतंय.
काल अर्जुनने मलायका प्रेग्नंट असल्याची बातमी देणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलं होतं. ‘ अत्यंत खालच्या थराला जाऊन आणि तेही अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून तुमचा असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो. रोज अशा बातम्या येतात आणि आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. पण हे अयोग्य आहे. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका,’ असं अर्जुनने म्हटलं होतं.
मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी हे कपल लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्या चर्चा दोघांनीही मनावर घेतल्या नव्हत्या. पण आता मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी मात्र दोघंही त्रस्त झाले आहेत.