भारत-पाकिस्तानच्या होणाऱ्या ICC World Cup सामन्यामुळे मिटला अर्जुन-सलमानमधील वाद?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:56 PM2023-10-12T13:56:40+5:302023-10-12T13:57:23+5:30
Bollywood actors: नेमकं असं काय घडलं ज्यामुळे सलमान आणि अर्जुनमधील वाद मिटल्याचं म्हटलं जात आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) यांच्यातील वाद जवळपास साऱ्यांनाच ठावूक आहे. अर्जुन, मलायकाला डेट करायला लागल्यापासून या दोन्ही कलाकारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे कोणत्याही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये हे कलाकार एकमेकांना कटाक्षाने टाळताना दिसतात. परंतु, आता या दोघांमध्ये सुरु असलेलं शीतयुद्ध थांबल्याचं सांगण्यात येत आहे. अर्जुनने अलिकडेच असं एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे या दोघांमधील वाद मिटल्याचं म्हटलं जात आहे.
लवकरच सलमानचा टायगर ३ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत करण्यात येत आहे. या सिनेमाचं १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप इंडिया वर्सेस पाकिस्तान या मॅच दरम्यान प्रमोशन केलं जाणार आहे. याविषयी सलमानने काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती. सलमानचा हा व्हिडीओ यशराज फिल्म्सने सुद्धा त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे सलमानचा हा व्हिडीओ अर्जुन कपूरने लाईक केला आहे. त्यामुळे अर्जुन कपूरचं लाइक पाहिल्यानंतर त्याच्यातील आणि सलमानमधील वाद मिटल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मलायकाला डेट करण्यापूर्वी अर्जुन सलमानची धाकटी बहीण अर्पिता हिला डेट करत होता. मात्र, त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर तो मलायकाला डेट करु लागला. मलायका ही सलमानचा भाऊ अरबाज खान याची पत्नी होती. त्यामुळे सलमानच्या मनात अर्जुनविषय़ी राग असल्याचं म्हटलं जातं.
दरम्यान, अर्जुनने कधीही सलमानसोबत असलेल्या वादावर भाष्य केलं नाही. परंतु, बोनी कपूर यांनी या दोघांच्या वादावर भाष्य केलं होतं. सलमानमुळे अर्जुनला इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून लॉन्च केलं. मात्र, सध्या आमच्या नात्याच तणाव आहेत, असं बोनी कपूर म्हणाले होते.