मलायका अरोरा प्रेग्नंसीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला, " आमचं आयुष्य..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 03:19 PM2023-06-01T15:19:14+5:302023-06-01T15:21:57+5:30
मलायका आणि अर्जुन नुकतेच लंडन व्हॅकेशनवरुन परतले आहेत.
बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेतलं कपल म्हणजे अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora). दोघांच्या अफेअरच्या, फोटोंच्या जोरदार चर्चा असतात. हे कपल कधी लग्न करणार याचीही लोकांना फार चौकशी असते. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी असल्याने दोघं ट्रोलही झाले आहेत. आता काय तर मलायका प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या अफवांवर अर्जुन कपूरने मौन सोडलं.
मलायका आणि अर्जुन नुकतेच लंडन व्हॅकेशनवरुन परतले आहेत. तेव्हाच मलायकाचे फोटो पाहून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या. यावर अर्जुन म्हणाला, "नकारात्मकता पसरवणं खूप सोप्पं आहे. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हा चांगला मार्ग आहे. आम्ही कलाकार आहोत आमचं वैयक्तिक आयुष्य नेहमी खाजगी राहत नाही. या प्रोफेशनमध्ये ही गोष्ट स्वीकारलीच पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही माध्यमांवर विश्वास ठेवतो. पण आम्ही फक्त एक माफक अपेक्षा करतो की आम्ही सुद्धा माणूस आहोत हे ध्यानात घ्या."
तो पुढे म्हणाला, "जर तुम्ही आमच्याबद्दल काही छापत आहात तर त्याची एकदा पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. एकदा विचार करत जा. अनेकदा गोष्टी लगेच मान्य करण्यापेक्षा आधी खात्री तर करा. तुम्ही कुठेही असं काही लिहू नका ज्याने एखाद्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल."
अर्जुन कपूर आणि मलायका गेल्या ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांना अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहिलं गेलं आहे. मलायका अरोराने अरबाज खानला घटस्फोट दिला त्याआधीपासूनच तिच्या आणि अर्जुनच्या अफेअरची चर्चा होती.