मलायकाआधी या व्यक्तीवर होते अर्जुन कपूरचे जीवापाड प्रेम, ब्रेकअपमुळे बसला होता जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:57 IST2021-03-23T18:54:20+5:302021-03-23T18:57:19+5:30

Arjun Kapoor had revealed details about his relationship: अर्जुन कपूरचे हेच एक अफेअर खूप गाजले आहे असे नाही. यापूर्वी देखील अर्जुन कपूर अफेअरमुळे चर्चेत होता.

Arjun Kapoor reveals about his breakup with Arpita Khan before his lovestory with Malaika Arora | मलायकाआधी या व्यक्तीवर होते अर्जुन कपूरचे जीवापाड प्रेम, ब्रेकअपमुळे बसला होता जबर धक्का

मलायकाआधी या व्यक्तीवर होते अर्जुन कपूरचे जीवापाड प्रेम, ब्रेकअपमुळे बसला होता जबर धक्का

मलायका अरोरा आणि अभिमेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र अर्जन कपूरचे हेच एक अफेअर खूप गाजले आहे असे नाही. यापूर्वी देखील अर्जुन कपूर अफेअरमुळे चर्चेत होता. ज्या व्यक्तीबरोबर अर्जनु कपूरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती होती दबंग सलमान खानची बहीण अर्पिता खान. 

दोघेही एकमेकांच्या आकंत प्रेमात बुडाले होते. माध्यमांमध्ये अर्पिता आणि अर्जुनच्या अफेअरच्या बातम्या प्रचंड गाजल्या. दोघेही लग्न करणार अशाच चर्चा होत्या. सलमानलाही दोघांचे नाते मान्य होते. मात्र दोघांमध्ये असे काही घडले की, एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणा-या कपलमध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने या अफेअरबाबत पहिल्यांदाच कबुली दिली होती. त्याने सांगितले होते की, या नात्याबाबत आम्ही दोघेही फारच  गंभीर होतो. आयुष्यात दोघांनी मिळून अनेक स्वप्नंही रंगवली होती.

मात्र नेमके काय बिनसले हे माझेच मला कळाले नाही. आमचे नाते पुढे जाऊ शकले नाही. अफेअर सुरु झाले तेव्हा आम्ही केवळ १८ वर्षांचे होते. तेव्हाच  एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. आमचे नाते फक्त दोन वर्षच टिकले. अर्पितालाच कदाचित हे नाते मान्य नसावे, अर्पिताने अर्जुनला ब्रेकअप करत असल्याचे सांगितले. या ब्रेकअपमुळे अर्जुनला मात्र जबर धक्काच बसला होता. त्यामुळे फिल्मी प्रेमकहाणी वाटावी अशीच अर्जुन कपूरचीही रिअल प्रेमाची कहाणी होती. 

अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासह रेशीमगाठीत अडकली असून तिचाही सुखी संसार सुरू आहे. अर्पिताला दोन मुलांची आई आहे. तर दुसरीकडे सलमानचा भाऊ अरबाज खानसह घटस्फोट घेत मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली आहे.

तर अरबाजनेही अभिनेत्री जॉर्जियासोबत असलेल्या संबंधांची कबुली दिली होती. मलायका आणि अरबाज दोघेही एकत्र राहत नसले तरीही आपल्या मुलांसह बराच वेळ घालवत असल्याचे दिसतात. बाप असल्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे खुद्द अरबाजनेच स्पष्ट केले होते. 

Web Title: Arjun Kapoor reveals about his breakup with Arpita Khan before his lovestory with Malaika Arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.