काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:32 PM2019-11-29T15:32:25+5:302019-11-29T15:46:07+5:30

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नाला आत्ता कुठे वर्ष पूर्ण झाले. पण वर्षभरातच दीपिकाच्या सवतीची चर्चा होतेय.

arjun kapoor says i am sauten to deepika padukone on friendship with ranveer singh |  काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा

 काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देअर्जुन कपूरचा ‘पानिपत’ 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नाला आत्ता कुठे वर्ष पूर्ण झाले. पण वर्षभरातच दीपिकाच्या सवतीची चर्चा होतेय. होय, अर्जुन कपूरनेदीपिका पादुकोणच्या सवतीबद्दल एक खुलासा केला.
होय, एका ताज्या मुलाखतीत अर्जुनने त्याच्या व रणवीरच्या मैत्रीबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. ‘ माझी गाणी ऐकल्यानंतर रणवीर मला मोठमोठे व्हॉइस मेसेज पाठवतो. अनेकदा माझ्या गालांवर किस करतो. आमच्या मैत्रीवर कशाचाही परिणाम होत नाही. मी तुझी सवत आहे, हे मी दीपिकालासुद्धा सांगितले आहे,’ असे अर्जुन म्हणाला.

आमच्या मैत्रीत कधीच आमचे स्टारडम आडवे आले नाही. रणवीरचे लग्न झाले. पण आमच्या मैत्रीत तसूभरही फरक पडला नाही. आमची मैत्री आधीसारखीच आहे. माझ्या ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा माझ्यापेक्षा रणवीर अधिक उत्सुक होता, असेही अर्जुनने सांगितले.


 

अर्जुन कपूरचा ‘पानिपत’ 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत क्रिती सॅनन, संजय दत्त मुख्य भूमिकेत  आहेत.   चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. क्रिती सॅनन हिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. यासोबतच  पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 
रणवीरचे म्हणाल तर सध्या तो ‘83’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपवर आधारित आहे. यात रणवीर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: arjun kapoor says i am sauten to deepika padukone on friendship with ranveer singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.