Arjun Kapoor : घाट्याचा सौदा! अर्जुन कपूरने इतक्या कोटीत विकला मलायका अरोराच्या शेजारचा फ्लॅट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:24 PM2022-07-21T16:24:38+5:302022-07-21T16:28:30+5:30
Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याने वर्षभरापूर्वी गर्लफ्रेन्ड मलायका अरोराच्या घराशेजारी एक 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. पण आता या फ्लॅटबद्दल वेगळीच बातमी कानावर येतेय.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने वर्षभरापूर्वी गर्लफ्रेन्ड मलायका अरोराच्या (Malaika Arora ) घराशेजारी एक 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. पण आता या फ्लॅटबद्दल वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, घाट्याचा सौदा करत, अर्जुनने मलायकाच्या घराशेजारचा हा फ्लॅट 16 कोटींमध्ये विकल्याचे कळतेय. एक वर्षाआधी त्याने तो 20 कोटींना खरेदी केला होता. 4 कोटींचं नुकसान करत अर्जुनने हा फ्लॅट अचानक का विकला? हे मात्र गुलदस्त्यात आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. अर्जुनने वांद्रे पश्चिमच्या 81 Aureate बिल्डिंगमध्ये 4364 स्क्वेअर फूटांचा फ्लॅट खरेदी केला होता. यासाठी त्याने 20 कोटी रूपये मोजले होते. या बिल्डिंगमध्ये मलायकाचा एक फ्लॅट आहे. याशिवाय करण कुंद्रा आणि सोनाक्षी सिन्हा यांनीही या बिल्डिंगमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे.
या बिल्डिंगमध्ये मलायकाने हा फ्लॅट 14.5 करोड रुपयांना बुक केला होता. पण बिल्डरने वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नव्हता म्हणून तिने त्याच्या विरोधात तक्रार देखील केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला आणि मलायकाला फ्लॅटचा ताबा मिळाला होता.
अभिनेता करण कुंद्राने देखील याच इमारतीत 14 कोटीला फ्लॅट विकत घेतला आहे. मार्च 2020 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने या बिल्डिंगच्या 16 व्या माळ्यावरचा फ्लॅट 14 कोटींना खरेदी केला आहे. यावर्षी मार्चमध्ये क्रिकेटर पृथ्वी शॉ ने याच इमारतीत 10.5 कोटीला एक फ्लॅट खरेदी केला.
अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच त्याचा ‘एक विलेन रिटर्न्स’ सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम,दिशा पटानी,तारा सुतारिया असे कलाकार आहेत. अर्जुन सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 29 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.