या फोटोत आहेत बॉलिवूडमधील दोन सितारे, ओळखा पाहू कोण आहेत हे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 14:21 IST2020-04-17T14:20:39+5:302020-04-17T14:21:46+5:30
या फोटोतील सगळेचजण बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील आहेत.

या फोटोत आहेत बॉलिवूडमधील दोन सितारे, ओळखा पाहू कोण आहेत हे?
लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार आपापल्या घरात असून ते सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. आपल्या घरातले फोटो, व्हिडिओ ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला होता.
आता तिच्यानंतर तिचा चुलत भाऊ अर्जुन कपूरने त्यांच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला असून या फोटोत आपल्याला अर्जुन, सोनमसोबतच मोहित मारवाह आणि अक्षय मारवाह यांना देखील पाहायला मिळत आहे.
या फोटोसोबत अर्जुनने एक छानशी कॅप्शन देखील दिली आहे. त्याने लिहिले आहे की, जेव्हा हे कोरोनाचे संकट संपेल त्यावेळी मी अशा आठवणी पुन्हा रिक्रिएट करेन... तुम्हाला काय वाटतं... तुम्ही पण हेच करणार ना... त्यावर सोनम कपूरने कमेंट करत लवकरच अशाप्रकारे पुन्हा फोटो काढूया असे लिहिले आहे.
अर्जुन कपूरने इश्कजादे या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या तो त्याच्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोरासोबत असलेल्या अफेअरमुळे अधिक चर्चेत आहे तर सोनम कपूरने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे.
सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सोनम आणि आनंद दोघेही काही दिवस तेथेच राहाणार आहेत. हे कपल काही दिवसांपूर्वी लंडनवरून परतले होते. यानंतर दोघांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते काही दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये होते. त्यावेळी त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोनमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता.