अर्जुन कपूर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच करतोय हे काम, जाणून घ्या याबाबत
By गीतांजली | Published: December 1, 2019 06:30 AM2019-12-01T06:30:00+5:302019-12-01T06:30:00+5:30
15 ते 20 किलोचे वजन घालून तो सीन शूट करणं माझ्यासाठी अवघड होते.
अर्जुन कपूरने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इश्कजादे सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अर्जुनला इश्कजादेमधील भूमिकेसाठी सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. लवकरच तो आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित पानीपत या ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा खास संवाद
सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेचा अभ्यास तू कसा केलास ?
सर्वात आधी तर या सिनेमाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरसोबत मी भरपूर वेळा घालवला. त्यांच्यासोबत बसून मी ही भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांचा इतिहासाचा अभ्यास खूप चांगला आहे. सदाशिव भाऊ हे एक महान योद्धा होते. सदाशिव भाऊ यांच्या स्वभावातील विविध शेड्स मला उभ्या करायच्या होत्या. त्यामुळे मी त्यावेळेचे राजकारण आधी समजून घेतले. रोज सकाळी उठून 6 वाजता मी घोडेस्वारी शिकायला जायचो. पण या सगळ्यात मला सर्वात महत्त्वाचे वाटते जो वेळ मी दिग्दर्शकासोबत घालवला तो. कारण त्याचा मला ही भूमिका उभी करताना खूप मदत झाली.
पानीपतचा ट्रेलर आऊट झाल्यावर तुला इंडस्ट्रीमधून काय प्रतिक्रिया मिळाल्या ?
मला अनेक फोने आले, मेसेजेस आले, इंडस्ट्रीसोबतच मित्र-परिवार कुटुंबीय सगळ्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. खूप दिवसांनंतर मला माझ्या कामासाठी इतकाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याआधी अशा प्रतिक्रिया मला हार्फ गर्लफ्रेंडचा ट्रेलर रिलीज झाल्यावर मिळाल्या होत्या. 'पानीपत'च्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसाद पाहात आम्ही योग्य मार्गवर चाललो आहे याचा विश्वास आम्हाला मिळाला.
हा सिनेमा करताना तुझ्यासाठी सर्वात कठीण सीन कोणता होता ?
संपूर्ण युद्धचे शूट माझ्यासाठी कठीण होते. कारण मला अंगात 15 ते 20 किलोचे चिलखत घालून घोड्यावर बसावे लागायचे. चिलखित घालून अॅक्शन करणे आणि त्यातही आम्ही सिनेमाचा शेवट मे महिन्याच्या गर्मी शूट केला. त्यामुळे मी असं अजिबात बोलणार नाही की हे सगळं सोप्पे होतं. कारण ते चिलखत घालायला चार लोक लागायची. अनेक गोष्टी होत्या ज्यांचे आव्हान आमच्या समोर होते. सगळ्यात कठीण मला वाटायचे आब्दालीचा सामना करणे. पण संजू सरांना(संजय दत्त)सोबत जेव्हा मी तो सीन शूट केला तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने तो शूट झाला.
हा सिनेमा तुझ्या करिअरमध्ये किती महत्त्वाचा आहे?
प्रत्येक कलाकाराला त्याच्या प्रत्येक सिनेमाकडून अनेक अपेक्षा असतात. या सिनेमाकडून मला जरा जास्त अपेक्षा आहेत कारण याची कथा दमदार आहे. मी सध्या करिअरच्या अशा पाईंटवर आहे जिथे मला आणखी अॅक्शन सिनेमांमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे हा सिनेमा माझ्या करिअरसाठी महत्त्वाचा आहे. मी एक साकारात्मक आवाहन म्हणून हा सिनेमा स्विकारला आणि मला वाटतेय की मी यात पास होऊन.
पानीपतनंतर अर्जुन आम्हाला कोणत्या सिनेमात दिसणार आहे ?
येत्या तीन महिन्यात संदीप और पिंकी फरार रिलीज होईल. नुकतीच मी रकुल प्रीतसोबत एका सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. यात नीना गुप्ता आणि कुमूद मिश्रासुद्धा आहेत. निखिल अडवाणी या सिनेमाची निर्मिती करतो आहे. अजून या सिनेमाच नाव ठरलेले नाही. ही एक कुटुंबीक कॉमेडी सिनेमा आहे.