सात वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अर्जुन कपूर पहिल्यांदाचं करणार ‘हे’ काम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 06:59 AM2018-05-31T06:59:18+5:302018-05-31T12:29:18+5:30
आशुतोष गोवारीकर पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. या चित्रपटाचे नाव काय, तर ‘पानीपत’. ...
आ ुतोष गोवारीकर पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. या चित्रपटाचे नाव काय, तर ‘पानीपत’. या चित्रपटाचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलाच. शिवाय या चित्रपटाच्या अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सॅनन या स्टारकास्टबद्दलही आम्ही तुम्हाला सांगितले. आता या पुढची एक बातमी आहे. होय, या चित्रपटासाठी अर्जुन आत्तापर्यंत केले नाही, ते करणार आहे. ऐकता ते खरे आहे. आपल्या सात वर्षांच्या करिअरमध्ये अर्जुनने जे केले नाही, ते तो ‘पानीपत’मध्ये करणार आहे. काय तर, केसांचे मुंडण. होय, आपल्या वाट्याला आलेली भूमिका साकारताना अर्जुनला कुठलीही कसर सोडायची नाही. त्यामुळे तो ही जोखिम पत्करायला तयार झाला आहे. एकंदर काय तर, अर्जुनला ‘पानीपत’मध्ये पाहणे चांगलेच इंटरेस्टिंग असणार आहे.
‘पानीपत’मध्येअर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिका जिवंत करणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर व संजय दत्त तलवारबाजी करताना दिसणार आहेत. क्रितीही यासाठी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतेयं.
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेली तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की ही युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता. पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधीआणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफा यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.
ALSO READ : आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानीपत'ला साज चढवणार अजय-अतुलचे संगीत
१५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात दुसरे युद्ध लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झाली व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले. १७६१ रोजी मराठे सदाशिवराव पेशवे आणि अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली यांच्यात तिसरे युद्ध झाले. या युद्धात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले,पण अब्दालीचीही मोठी हानी झाली.