Anshula Kapoor : अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर प्रेमात? ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:08 AM2022-11-29T11:08:07+5:302022-11-29T11:08:45+5:30

Anshula Kapoor : बोनी कपूरची लेक आणि अर्जुन कपूरची बहिण अंशुला सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. होय, अंशुला तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे.

Arjun Kapoor's sister anshula kapoor dating screen writer rohan thakkar goa trip photos | Anshula Kapoor : अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर प्रेमात? ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर प्रेमात? ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

googlenewsNext

अंशुला कपूर (Anshula Kapoor) फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तरीही ती फिल्म इंडस्ट्रीचा ओळखीचा चेहरा आहे. होय, बॉलिवूड चित्रपटांत सक्रीय नसूनही लोकप्रिय असलेल्या स्टार किड्सच्या यादीत तिचं नाव आघाडीवर आहे. बोनी कपूरची लेक आणि अर्जुन कपूरची  (Arjun Kapoor) बहिण अंशुला सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. होय, अंशुला तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि आता अशुंला हिलाही तिचं प्रेम मिळाल्याचं मानलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंशुला एका हँडसमसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतेय. अंशुला याच हँडसमच्या प्रेमात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकताच अंशुलाने त्याच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आणि यानंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलं.

मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुनची धाकटी बहीण अंशुला लेखक रोहन ठक्करला डेट करत आहे. रोहनने हिंदी सिनेसृष्टीत काम केलं नाही मात्र त्याने इतर भाषांमध्ये काही प्रोजेक्ट केले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  अंशुला आणि रोहन  रिलेशनशिपमध्ये आहेत. याच वर्षी दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. अगदी अंशुलाच्या कुटुंबालाही रोहनबद्दल माहित आहे. त्यांनाही तो पसंत आहे. नुकतेच दोघेही व्हॅकेशनवर गेले होते. दोघांनी गोव्याला सोबत वेळ घालवला. अंशुलानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. याआधी दोघं लंडन ट्रिपवर गेले होते.

दरम्यान अंशुला सध्या तरी यावर काहीही बोलायला तयार नाही. ‘मी यावर काहीही बोलणार नाही. मी या चर्चांना नाकारणार नाही, तसंच स्वीकारणारही नाही. माझ्या भावनांचा आदर केल्याबद्दल आभार,’असं तिने म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor)


 
अर्जुन आपल्या धाकट्या बहिणीवर प्रचंड प्रेम करतो. अगदी अंशुला त्याचा जीव की प्राण आहे. ‘ मी माझ्या बहिणीच्या सगळ्यांत जवळ आहे. ती माझी  लेडी ऑफ लाईफ आहे,असं अर्जुन तिच्याबद्दल एका मुलाखतीत म्हणाला होता. अर्जुन अंशुलाप्रति कमालीचा प्रोटेक्टिव्ह आहे. अनेकप्रसंगी त्याने हे दाखवून दिले आहे. आईच्या मृत्यूनंतर अर्जुन व अंशुला या दोघांनी एकमेकांना सांभाळलं. याकाळा अंशुला अर्जुनची जणू आई बनली होती.

Web Title: Arjun Kapoor's sister anshula kapoor dating screen writer rohan thakkar goa trip photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.