लंच डेटसाठी वाट्टेल ते, मुलाला घरी सोडून ही सेलिब्रिटी जोडी गेली डेटला......
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:25 PM2019-08-06T14:25:00+5:302019-08-06T14:29:02+5:30
गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे.‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
नुकतेच अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने बाळाला जन्म दिला. अरिक रामपाल असे बाळाचे नाव आहे.विशेष म्हणजे या दोघांनीही अजून लग्न केलेले नाही. लग्न न करताच गॅब्रिएल गरोदर राहिली. आणि तिने बाळाला जन्म दिला. प्रेग्नेंसीनंतर पहिल्यांदाच अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लंचला गेले होते. विशेष म्हणजे यावेळी दोघांबरोबर त्यांचे बाळ नव्हते. अरिकच्या जन्मामुळे अर्जुन आणि गॅब्रिएला खूप खुश असले तरीही बाळाला घरी सोडूनच दोघेही क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसले.सध्या या दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
सध्या अर्जुन रामपाल आपल्या या नवीन कुटुंबासोबत एन्जॉय करत आहेत. त्यामुळे तो त्याच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहत आहे. गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे.‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
बाळ होऊन काहीच दिवस झाल्यानंतर गॅब्रिएलाने तिचे वजन चांगलेच कमी केले आहे. तिने वर्कआऊटनंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती एकदम फिट दिसत असून तिचा हा फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तिने खरंच काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे.
गॅब्रिएलाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचा एक सेल्फी शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, हा फोटो माझ्या मुलाच्या जन्मानंतर ११ दिवसानंतर काढण्यात आला आहे. मी सगळ्यांना एवढेच सांगेन की, गरोदरपणात देखील व्यायाम करणे सोडू नका... गरोदरपणात योगा करण्याचा मला खूपच चांगला फायदा झाला.
अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत २० वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएमध्ये गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघे एकत्र दिसू लागले.