कधी कधी मला तुझे ओठ...असे का? वाचा, ट्रोलरच्या प्रश्नावर अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने काय दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:14 AM2020-05-14T11:14:56+5:302020-05-14T11:15:58+5:30

 गॅब्रिएलाने फोटो शेअर केलेत आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

arjun rampal girlfriend gabriella demetriades reply when a user curious about her lips-ram | कधी कधी मला तुझे ओठ...असे का? वाचा, ट्रोलरच्या प्रश्नावर अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने काय दिले उत्तर

कधी कधी मला तुझे ओठ...असे का? वाचा, ट्रोलरच्या प्रश्नावर अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने काय दिले उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या फिल्मी दुनियापासून दूर आहे. पण हो, गर्लफ्रेन्ड  गॅब्रिएला डेमिट्रिएड्समुळे जाम चर्चेत आहे. पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुनने गॅब्रिएलासोबतचे रिलेशनशिप जगजाहिर केले होते. दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही. पण लग्नाआधीच गॅब्रिएला अर्जुनच्या मुलाची आई झाली. तर याच गॅब्रिएलामुळे अर्जुन सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:चे काही फोटो शेअर केले होते. सध्या तिच्या या फोटोंमुळे ती व अर्जुन दोघेही चर्चेत आहेत. गॅब्रिएलाने हे फोटो शेअर केलेत आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

 गॅब्रिएलाचा फोटो पाहून एका युजरने तिच्या ओठांवर कमेंट केली.  ‘कधी कधी मला तुझे ओठ विचित्र वाटतात. असे का?’असे या युजरने लिहिले. यावर गॅब्रिएलाने काय उत्तर द्यावे? तिने असे काही उत्तर दिले की, या युजरची बोलती बंद झाली. होय, ‘मी याबद्दल माझ्या आई-वडिलांशी बोलेन आणि मग याचे उत्तर देईन,’असे उत्तर तिने दिले.

तिच्या या उत्तराने युजर समजायचे ते समजला आणि अचानक त्याने गॅब्रिएलाच्या ओठांची प्रशंसा करणे सुरु केले. ‘असे नको म्हणूस. कारण हे नैसर्गिक आहेत. हो कधी कधी ते विचित्र वाटतात. अन्यथा ते अतिशय सुंदर आहेत,’ असे त्याने लिहिले. यावर गॅब्रिएलाने काहीही उत्तर दिले नाही.

 अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत २० वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघे एकत्र दिसू लागले. गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

Web Title: arjun rampal girlfriend gabriella demetriades reply when a user curious about her lips-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.