ऐकलं का? ‘Money Heist’वर आधारित सिनेमा येतोय...! जाणून घ्या काय आहे नाव, कोण साकारणार ‘प्रोफेसर’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 11:00 AM2021-11-14T11:00:05+5:302021-11-14T11:01:54+5:30

तुम्हीही ‘Money Heist’ या सीरिजचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ‘मनी हाईस्ट’चे देसी व्हर्जन तुम्ही बघू शकणार आहात.

Arjun Rampal to play Professor in Abbas Mustan’s desi spin of Money Heist? | ऐकलं का? ‘Money Heist’वर आधारित सिनेमा येतोय...! जाणून घ्या काय आहे नाव, कोण साकारणार ‘प्रोफेसर’

ऐकलं का? ‘Money Heist’वर आधारित सिनेमा येतोय...! जाणून घ्या काय आहे नाव, कोण साकारणार ‘प्रोफेसर’

googlenewsNext

तुम्हीही ‘मनी हाईस्ट’  (Money Heist) या सीरिजचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ‘मनी हाईस्ट’चे देसी व्हर्जन तुम्ही बघू शकणार आहात. ‘मनी हाईस्ट’ ही स्पॅनिश ड्रामा वेबसीरिज तुफान लोकप्रिय झाली. या सीरिजचा पाचवा व अखेरचा सीझन दोन भागात प्रदर्शित होतोय. पहिला पार्ट गेल्या सप्टेंबरमध्येच रिलीज झाला आणि दुसरा पार्ट येत्या डिसेंबर महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आता बॉलिवूडमध अब्बास मस्तान या सीरिजचा चित्रपटरूपातील देसी व्हर्जन बनवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

‘मनी हाईस्ट’वर आधारित चित्रपटाचे नाव ‘थ्री मंकीज’ (Three Monkeys) असणार आहे. चर्चा खरी मानाल तर,अब्बास यांचा मुलगा मुस्तफा या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आता हा चित्रपट बनलाच तर यात प्रोफेसरची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर प्रोफेसरच्या रोलसाठी अब्बास मस्तान जोडीने अर्जुन रामपालचे (Arjun Rampal) नाव फायनल केले आहे.

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन रामपाल प्रोफेसरची तर मुस्तफा रॉबर्सची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात या दोघांशिवाय आणखी दोन कलाकार असतील, जे रॉबर्स बनतील. हे तिन्ही चोर प्रोफेसरसोबत मिळून जगातील सर्वात मोठी चोरी करतील. 

याच महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल, अशी शक्यता आहे. 2022 च्या मध्याला हा चित्रपट रिलीज होणार असे म्हटले जात आहे. 
‘मनी हाईस्ट’मध्ये  अल्वारो मारटो या स्पॅशिन अभिनेत्याने प्रोफेसरची भूमिका साकारली होती. त्याचे चाहते अख्ख्या जगभर पसरलेले आहेत.  अर्जुन रामपाल या रोलमध्ये कितीसा चांगला दिसेल हे चित्रपट आल्यानंतर कळेलच, पण तूर्तास ाारतातील ‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मनी हाईस्ट ही एक स्पॅनिश सीरीज आहे. या सीरिजचा पहिला सीझन संपूर्ण जगभर गाजला होता. स्वत:कडे गमावण्यासारखे काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो, असे याचे मूळ कथानक आहे. दहा वर्षांपासून सुरू असणारी चोरीची तयारी आणि त्यानंतर जगातली सर्वात मोठी चोरी. यावर आधारित ही सीरिज होती.या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. 
 

Web Title: Arjun Rampal to play Professor in Abbas Mustan’s desi spin of Money Heist?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.