अर्जुन रामपालच्या डोळयाला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 04:25 PM2017-01-04T16:25:23+5:302017-01-04T16:25:23+5:30

‘डोळयाला झालेली छोटीशी दुखापतही किती गंभीर रूप घेऊ शकते हे मला आता कळतेय. जेवढे गंभीर दिसतेय तेवढे गंभीर ते नाही. लवकरच भेटू.’ अशी कॅप्शन त्याने दिली आहे.

Arjun Rampal's injury to the eye | अर्जुन रामपालच्या डोळयाला दुखापत

अर्जुन रामपालच्या डोळयाला दुखापत

googlenewsNext
िनेता अर्जुन रामपालसाठी दुखापत होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. सेटवर त्याला काही ना काही दुखापत होतच असते. अलीकडेच त्याला डोळयाच्या दुखापतीला सामोरे जावे लागले. मात्र, आता तो एकदम व्यवस्थित असून काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे त्याने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘डोळयाला झालेली छोटीशी दुखापतही किती गंभीर रूप घेऊ शकते हे मला आता कळतेय. जेवढे गंभीर दिसतेय तेवढे गंभीर ते नाही. लवकरच भेटू.’ अशी कॅप्शन त्याने दिली आहे. 




हँडसम अर्जुन रामपाल चित्रपटात गंभीर भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘डॅड’ या अरूण गवळींच्या बायोपिकसाठी तो सध्या शूटिंग करत असून, त्याच्या सेटवर हा अपघात घडल्याचे कळतेय. त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत आपण पाहू शकतो की, त्याच्या डोळयावर बँडेज लावण्यात आले आहे. त्या बँडेजमुळे त्याचा चेहराच झाकला जातोय. ‘कहानी २’ च्या सेटवर अलीकडेच एक सीन शूट करताना त्याला ही दुखापत झाल्याचे कळते आहे. दुखापतीनंतर त्याने काही दिवस आराम केला. तेव्हा कुठे आता तो डोळा त्याला उघडता येत आहे. 

‘रॉक आॅन २‘ आणि ‘कहानी २’ हे दोन्ही त्याचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. कथानक आणि त्याला मिळालेल्या भूमिका तेवढ्या काही प्रेक्षकांवर प्रभाव करू न शकल्याने त्याच्या पदरी निराशाच आली आहे. आता त्याला त्याचा आगामी चित्रपट ‘डॅडी‘ कडून खूप अपेक्षा आहेत. बऱ्याच वर्षांनंतर त्याला मुख्य भूमिकेत काम करता येणार असल्याने तो आनंदित आहे. 

Web Title: Arjun Rampal's injury to the eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.